नंदूरबार l प्रतिनिधी
सरलकृष्ण फार्मर प्रोड्यूसर कंपनी मार्फत वावद येथे एक रुपया मध्ये पीकविमा शिबिर घेण्यात आले.
जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या आदेशान्वये कृषी विभाग नंदुरबार यांच्यामार्फत वावद येथील सरलकृष्ण फार्मर प्रोड्यूसर कंपनी CSC सेंटर यांच्या सहकार्याने वावद व परिसर परिसरातील शेतकरी बंधूंना एक रुपयांमध्ये पीकविमा शिबिर घेण्यात आले.
सदर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी आपल्या पिकाचा पिकविमा काढला.या शिबिरास कृषी विभागातर्फे अक्षय वसावे कृषी सहाय्यक , एस. एम. गिरासे कृषी पर्यवेक्षक , सरपंच आकाबाई भिल व सरलकृष्ण फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष मनोज पाटील व विविध मान्यवर उपस्थित होते.








