Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उघड्यावरील मांसविक्री आणि चिकन- मटणाचा लॉऱ्या तात्काळ बंद न केल्यास उपोषणाचा इशारा

team by team
July 15, 2023
in राजकीय
0
उघड्यावरील मांसविक्री आणि चिकन- मटणाचा लॉऱ्या तात्काळ बंद न केल्यास उपोषणाचा इशारा

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील विविध भागात उघड्यावर मांसविक्री सर्रास सुरू असून, त्यामुळे परिसरात रोगराई पसरत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह लहान मुले आजारी पडत आहे. आता हिंदूंचा पवित्र अधिक-श्रावण मास, जैनांच्या चातुर्मास सुरू होत आहे,

यासाठी नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील उघड्यावरील मांसविक्री आणि चिकन- मटणाचा लॉऱ्या तात्काळ बंद करण्याची मागणी हिंदु सेवा सहाय्य समिती, पुरोहित संघ, विविध मंदिराचे पुजारी आणि जैन संघाने निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक पी आर पाटील, आरोग्य अधिकारी विशाल कांबळी यांच्याकडे केली.२५जुलैपर्यंत कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, हिंदूंचा पवित्र अधिक-श्रावण मास, जैनांच्या चातुर्मासया महिनांमध्ये उपासनेला अनन्य साधारण महत्व आहे. ज्यावेळी हिंदु समाजातील लोक मंदिरात जातात त्यावेळी चौका चौकात आणि गल्लीबोळात अवैधरित्या उघड्यावर मांस विकणारे यांचा दुकानांमध्ये मांसाचे तुकडे लटकलेले पाहायला मिळतात त्यामुळे भावना दुखत असल्याने उघड्यावरील मांसविक्री तत्काळ बंद करणे आवश्यक आहे.

कायद्यानुसार उघड्यावर मांसविक्री करण्यास बंदी असतांना यापुर्वी वेळोवेळी निवेदन देवून सुध्दा त्याची अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही. यापूर्वीही आम्ही या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषण केले त्यावेळी प्रशासनाने तात्पुरती नोटीस देणे, दंडात्मक कारवाई केली, परंतु दंडाची रक्कम थोडीच असल्याने अवैधपणे मांसविक्री करणारे ती रक्कम भरून पुन्हा आपला व्यवसाय थाटतात.

त्यामुळे या अवैध व्यवसायावर आळा बसत नाही. तरी जे विक्रेते नोटीस, दंडात्मक कारवाईला जुमानत नसतील त्यांची दुकाने सील करून जप्तीची कडक कारवाई करावी. फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड ऍक्ट 2011 नुसार उघड्यावर मांस विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे असे असतांना उघड्यावरील मांसविक्री आणि त्यापासून विविध पदार्थ बनवून विक्री करणार्‍या अनधिकृत गाड्या यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करून त्या कायमस्वरूपी बंद करण्यात यावे.प्रशासनाकडून २५ जुलै पर्यंत अवैध मांस विक्रेत्यांवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन -उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा निवेदनातुन देण्यात आला.

निवेदनावर नरेंद्र पाटील, मोहन जैन, प्रदीप भट, रवी जैन, प्रमोद जोशी, संतोष देवळालिंकर, पंकज त्रिवेदी, दिनेश पाठक, संतोष जैन, जयेश भोई, आकाश गावित, पंकज डाबी, गणेश राजपूत, जितेंद्र मराठे, उज्वल राजपूत आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आणि राष्ट्रवादीने केले फलकात बदल

Next Post

काँग्रेस सेवा दलाचे सरचिटणीस मिश्रा यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनात बैठक

Next Post
काँग्रेस सेवा दलाचे सरचिटणीस मिश्रा यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनात बैठक

काँग्रेस सेवा दलाचे सरचिटणीस मिश्रा यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनात बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add