नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील जगतापवाडी चौफुलीजवळून विना परवाना जनावरांची वाहतूक करणाऱ्या पाच वाहन पोलिसांनी पकडले असून त्यातील २२ जनावरांची सुटका करण्यात आली असून सदर वाहनांसह सुमारे १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . याप्रकरणी पाच संशयितांविरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार शहरातील जगतापवाडी चौफुलीजवळ ट्रक टर्मिनल रस्त्यावर जनावरे घेवून जाण्याचा परवाना नसतांना दिपक साहेबराव परदेशी रा . अशोक नगर , दोंडाईचा , गणेश खापरसिंग वसावा रा.आष्टा ता.कुकरमुंडा , जितेंद्र भाईदास परदेशी रा.दोंडाईचा , विशाल आनंदा पाटील रा.दोंडाईचा व विनोद मराठे रा.चिनोदा ता.तळोदा यांनी त्यांच्या ताब्यातील पाच पिकअप वाहनात जनावरांना निर्दयीतीने कोंबून वाहतूक करतांना आढळून आले . त्यांच्याकडून ९ लाख ५० हजार रुपये किंमतीची पाच पिकअप वाहने व १ लाख ७८ हजार ५०० रुपये किंमतीचे २२ गोवंश असा ११ लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . याबाबत पोना.भटू धनगर यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागविणे प्रतिबंध अधिनियम १ ९ ६० चे कलम ११ ( ड ) , मोटार वाहन कायदा कलम ६६ / १ ९ २ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत .