Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भाजपाच नगरसेवक व नगराध्यक्ष माझ्या संपर्कात : राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांचे प्रतिपादन

team by team
September 26, 2021
in Uncategorized
0
भाजपाच नगरसेवक व नगराध्यक्ष माझ्या संपर्कात : राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांचे प्रतिपादन
तळोदा l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे जेवढे ही नगरसेवक मी निवडून आणले आहे व ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यांनी मला शब्द दिला आहे की एकदा विधानपरिषदेची निवडणूक झाली की आम्ही सर्व राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करू एवढेच नव्हे तर नगराध्यक्ष देखील माझ्या संपर्कात आहे. असे प्रतिपादन मा.आ. तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी आज झालेल्या तळोदा शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश व पक्षाची कार्यकारणी पद वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी केले.
            तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक भवन येथे आज सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहर व तालुक्यातील पक्षात प्रवेश व कार्यकारिणी पद वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ.तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी हे होते तसेच मंचावर शहर अध्यक्ष योगेश मराठे, डॉ.रामराव आघाडे, डॉ. जगदीश मराठे, डॉ.लक्ष्मीकांत गिरणार, नगरसेविका अनिता परदेशी, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, सुजाता क्षत्रिय, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत चौधरी, केसरसिंग क्षत्रिय, ओ बी सी सेलचे प्रदेश अध्यक्ष कमलेश चौधरी, नितीन पाडवी, पुंडलिक राजपूत, अल्पसंख्यांक माजी जिल्हाध्यक्ष आरिफ मिया जहागीरदार, मुस्लिम समाज अध्यक्ष आरिफ शेख नुरा,आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना मा.आ.पाडवी म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे जेवढे ही नगरसेवक मी निवडून आणले आहे व  ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यांनी मला शब्द दिला आहे की एकदा विधानपरिषदेची निवडणूक झाली की आम्ही सर्व राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करू एवढेच नव्हे तर नगराध्यक्ष देखील माझ्या संपर्कात आहे. त्यांना देखील माझ्याशिवाय पर्याय नाही या सर्वांना माझ्याकडे यावेच लागेल असे मा.आ.उदेसिंग पाडवी यांनी म्हटले.पुढे ते म्हणाले की,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करणारा पक्ष आहे येत्या पालिका निवडणुकीत तळोदा शहादा पालिका वर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला शिवाय राहणार नाही. पालिके मधील निवडून आलेले नगरसेवक माझ्या संपर्कात आहे. व त्यांना माझ्या शिवाय पर्याय नाही. इच्छुकांची यादी आपणाकडे असून ती वेळेवर जाहीर करू व राष्ट्रवादी तर्फे तळोदा शहरासाठी निधी आणून  या शहराचा सर्वांगीण विकास करण्यात येईल असे त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष योगेश मराठे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.अविनाश मराठे यांनी केले. याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष म्हणून गणेश पाडवी शहर उपाध्यक्ष अनिल पवार योगेश पाडवी यामीन बागवान सरचिटणीस महेंद्र पोटे रवींद्र गाडे राकेश जाणकार यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकारणी सदस्यांना पदी नियुक्त प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी ग्रामीण व शहरी भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला पदाधिकाऱ्यांकडून या सर्वांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप परदेशी, कमलेश पाडवी, गोकुळ गुरव, संजय वानखेडे, विक्की क्षत्रिय, राहुल पाडवी, इम्रान शिखलीकर, नदीम बागवान, नितीन मराठे, महेंद्र पोटे, धर्मराज पवार, यांसह राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
बातमी शेअर करा
Previous Post

विभागीय कराटे स्पर्धेत एस. ए. मिशन हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे यश

Next Post

विना परवाना जनावरांची वाहतूक करणाऱ्या पाच वाहन पोलिसांनी पकडले, २२ जनावरांची सुटका, पाच संशयितांविरुध्द गुन्हा

Next Post

विना परवाना जनावरांची वाहतूक करणाऱ्या पाच वाहन पोलिसांनी पकडले, २२ जनावरांची सुटका, पाच संशयितांविरुध्द गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add