नंदुरबार | प्रतिनिधी
ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन व महाराष्ट्र कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ शहरातील एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम स्कूल नंदुरबार येथे विभागीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे ११५ ते १२० मुलामुलींनी सहभाग घेतला.
६ ते १७ वयोगटासाठी काता आणि कुमिती या दोन प्रकारात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये एस. ए. मिशन हायस्कुलची खेळाडू विद्यार्थिनी मयुरी पाटील हिने चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले तर रौप्य पदकाचा मान सुष्मिता वळवी,प्रणिता पराडके तसेच कास्य पदक विजेते चेतना शेवाळे, दीक्षा वसावे या मुलींनी यशस्वी कामगिरी करुन शाळेचे नाव लौकिक केले या यशाबद्दल एस.ए.मिशन हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य सौ. नूतनवर्षा वळवी यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी उपमुख्याध्यापक विजय पवार , सी.पी.बोरसे, पर्यवेक्षक मीनल वळवी, पर्यवेक्षिका वंदना जामबिलसा, जेष्ठ शिक्षक श्री .गर्गे , ऑल नंदुरबार जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष संतोष मराठे, सचिव गणेश मराठे आदी उपस्थित होते. सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन उपस्थितांनी कौतुक केले. या स्पर्धेला राष्ट्रीय पंच म्हणून योगिता बैसाने,स्वयमसिद्धा मास्टर ट्रेनर ज्योती चौधरी व जिल्ह्यातील पंच म्हणून जबाबदारी पवन बिराडे, अमित पाडवी, गणेश गोसावी, विशाल सोनवणे, नरेंद्र बिराडे, याकुब मोहम्मद, ओंकार जाधव, निखिल राठोड, लीना पंडित, ओम गोसावी, यांनी पार पाडली. या स्पर्धेचे ऑफिशियल रेफ्री म्हणून निलेश पाडवी व पुष्कराज वळवी यांनी काम पाहिले सूत्रसंचालन शृष्टी गावित तर आभार जिल्हा सचिव गणेश मराठे यांनी मानले.