नंदूरबार l प्रतिनिधी
भालेर ता. नंदुरबार सह दहा गावात जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या
कामास सुरुवात झाली आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत नंदूरबार तालुक्यातील भालेर , शिंदगव्हाण ,भागसरी खोंडामळी जूनमोहिदे,बामडोद कलमाडी, विखरण,धामडोद आदी गावात फेब्रुवारी २३ मध्ये सर्वेक्षण सर्वेक्षण करण्यात आले होते. पाणीपुरवठा योजनेसाठी २०५३ सालापर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करून गावातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ जल पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत गावातील शेवटच्या घरापर्यंत जलवाहिनी टाकून नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचण्याचा उद्दिष्ट ठेवण्यात आला आहे.
प्रत्येक गावात लोकसंख्येच्या हिशोबाने पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे . शिंदगव्हाण येथे एम. बी. आर. व फिल्टर प्लांट बसविण्यात येणार आहे .येथूनच दहा गावांना शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे. चाळीसगाव येथील सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येत आहे लवकरच पाण्याच्या टाकीच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.
*जल मिशन योजनेत सर्व गावापर्यंत बाहेरून किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.
*योजनेतील दाही गावांमध्ये एकूण दहा किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात येईल.
*वीस वर्षे पुढील लोकसंख्येप्रमाणे पाणी पुरेल असे नियोजन.
* या योजनेसाठी तापी नदीवरून पाणीपुरवठा होणार आहे.








