नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील पोलीस कवायत मैदानावर आज आशा व्यसनमुक्ती केंद्रातर्फे नशामुक्त भारत पंधरवाड्याचा समारोप करण्यात आला. पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते व्यसनाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्य विभाग, समाजकल्याण विभाग, जिल्हा समाज कल्याण जिल्हा परिषद नंदुरबार तसेच नेटवर्क ऑफ बाय पिपल लिंव्हींग विथ एच.आय.व्ही/एड्स संस्था नंदुरबार, आशा व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत पंधरवाडा राबविण्यात आला. तसेच रोजी पोलीस ग्राउंड नंदुरबार येथे व्यसनमुक्ती कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित उपस्थित होते. यावेळी डॉ.विजयकुमार गावित यांनी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने व्यसनमुक्ती विषयी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ.गावित यांच्या हस्ते नशामुक्तचा पुतळा दहन करण्यात आला. त्यानंतर पोलीस ग्राउंडपासून रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमात समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगावकर, समाज कल्याण विभागाचे केतन परदेशी, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वर्षा विद्या विलास, चिटणीस अमोल स.भा.मडामे, संघटक विक्रम सी. गावित, आशा व्यसनमुक्ती केंद्र नंदुरबारचे अध्यक्षा आशा माळी, समन्वयक अशोक नाईक, समुपदेशक नितीन पाटील आदी उपस्थित होते.








