नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्याच्या लोकप्रिय खा. डॉ. हिना विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त अर्हत प्रतिष्ठान, नंदुरबारच्या वतीने खासदार चषक २४ ते२९ जून भव्य क्रीडा महोत्सव सप्ताहाचे उद्घाटन श्रॉफ हायस्कूल हायस्कूल येथील साईबाबा हॉल येथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खा. डॉ.गावित यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
दरम्यान 14 वर्षे वयोगटातील मुले मुली बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विचार मंचावर श्रॉफ हायस्कूल प्राचार्य सौ सुषमा शहा, अरविंद कुंवर, बाबा राजपूत, ईश्वर धामणे , सुभाष पानपाटील, राजेश शहा, डॉ. दिनेश बैसाणे, संतोष शिरसाठ, श्री.त्रिवेदी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बुद्धिबळ स्पर्धेत उपस्थित स्पर्धक तथा पालक यांना खा. डॉ.हिना गावित यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विजय जगताप, सिद्धार्थ साळुंके, गौतम पानपाटील, सुलतान मन्सुरी दीपक बंडीवार, सौरभ साळुंके, सचिन पिंपळे, नंदू पाटील, संदीप खलाणे, हर्षवर्धन बैसाने, जगदीश वंजारी सर, रामा हटकर, मनीष सनत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटील सरांनी केले आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक सुभाष पानपाटील यांनी केले.








