म्हसावद l प्रतिनिधी
अनुदानित आश्रम शाळा जळखे ता. जि. नंदुरबार येथे शैक्षणिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती .
या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदासभाई पाटील यांनी केले.या कार्यशाळेमध्ये आश्रम शाळेतील २७ विकास सहयोगी सहभागी झाले होते. कार्यशाळेत ७ सत्रात वेगवेगळे मान्यवरांनी सर्व विकास सहयोगिंना मार्गदर्शन केले.डॉ. उमेश शिंदे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरे जाताना शिक्षकांना कोणकोणती आव्हाने येणार आहेत याविषयी चर्चा करण्यात आली. त्यासाठी शिक्षकांनी आपल्या ज्ञानात प्रगल्भता वाढवायची गरज आहे.
व्यसयाय शिक्षणाची जोड आता नवीन शैक्षणिक धोरणात महत्वाची आहे. असे डॉ.उमेश शिंदे यांनी स्पष्ट केले. सुरेश सोनार यांनी सुंदर हस्ताक्षराचे फायदे व फलक लेखन विषयी अनमोल असे मार्गदर्शन केले.डॉ. गौरव तांबोळी यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. सिकलसेल विषयी विध्यार्थ्यांची काळजी जास्त घ्यावी लागेल कारण कोणताही आजार झाल्यास तात्काळ त्याच्यावर उपचार करावा. अशा अनेक आजारावर काळजी व उपाय स्पष्ट केले.
निर्मल माळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण )यांनी एखाद्या संस्थेत काम करतांना कर्मचाऱ्यांचे परस्पर सहसंबंध कसे असावेत याविषयी त्यांच्या अनुभवातून सर्वाना सांगितले.पुरुषोत्तम काळे यांनी आपल्यावर राष्ट्र निर्माण करण्याची मोठी जबाबदारी आहे. आणि ती कशी करावी याविषयी त्यांनी मुक्तचिंतनातून सर्वांसमोर माडले. प्रशांत पवार यांनी व्यायाम व योगाचे महत्व सांगत सकाळी अतिशय सुंदररित्या सर्वांकडून व्यायाम व योग प्राणायाम करून घेतले.
मा. उमेश शिंदे यांनी (स्वपरिचय ) या सत्रातुन स्वतःची ओळख कशी करून दयावी याविषयी सांगितले अशाप्रकारे विविध विषयांवर वैचारिक मांडणी झाली.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी जीवन संवर्धन फाउंडेशन मुंबई येथील प्रमुख सदाशिवराव चव्हाण हे उपस्थित होते. तसेच संस्थेचे सचिव डॉ. नितीन पंचभाई संस्थेचे पदाधिकारी ललितकुमार पाठक, सुखदेव माळी, धनराजजी कातोरे, केदारनाथ कवडीवाले, बळवंत निकुम, ॲड. संजय पुराणिक हे उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रमुख म्हणून प्रा. संजय पाटील हे उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक आश्रमशाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक प्रमोद सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन दीपक महाजन व नरेंद्र मराठे यांनी केले होते. तसेच माध्यमिक मुख्याध्यापक प्रवीण सोनवणे यांनी आभार व्यक्त केले.








