Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जळखे येथे अनुदानित आश्रम शाळेत शैक्षणिक कार्यशाळा

team by team
June 12, 2023
in राज्य
0
जळखे येथे अनुदानित आश्रम शाळेत शैक्षणिक कार्यशाळा

म्हसावद l प्रतिनिधी
अनुदानित आश्रम शाळा जळखे ता. जि. नंदुरबार येथे शैक्षणिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती .
   या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष  कृष्णदासभाई पाटील यांनी केले.या कार्यशाळेमध्ये आश्रम शाळेतील २७  विकास सहयोगी सहभागी झाले होते. कार्यशाळेत ७ सत्रात वेगवेगळे मान्यवरांनी सर्व विकास सहयोगिंना मार्गदर्शन केले.डॉ. उमेश शिंदे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरे जाताना शिक्षकांना कोणकोणती आव्हाने येणार आहेत याविषयी चर्चा करण्यात आली. त्यासाठी शिक्षकांनी आपल्या ज्ञानात प्रगल्भता वाढवायची गरज आहे.
व्यसयाय शिक्षणाची जोड आता नवीन शैक्षणिक धोरणात महत्वाची आहे. असे डॉ.उमेश शिंदे यांनी स्पष्ट केले. सुरेश सोनार  यांनी सुंदर हस्ताक्षराचे फायदे व फलक लेखन विषयी अनमोल असे मार्गदर्शन केले.डॉ. गौरव तांबोळी यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. सिकलसेल विषयी विध्यार्थ्यांची काळजी जास्त घ्यावी लागेल कारण कोणताही आजार झाल्यास तात्काळ त्याच्यावर उपचार करावा. अशा अनेक आजारावर काळजी व उपाय स्पष्ट केले.
निर्मल माळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण )यांनी एखाद्या संस्थेत काम करतांना कर्मचाऱ्यांचे परस्पर सहसंबंध कसे असावेत याविषयी त्यांच्या अनुभवातून सर्वाना सांगितले.पुरुषोत्तम काळे यांनी आपल्यावर राष्ट्र निर्माण करण्याची मोठी जबाबदारी आहे. आणि ती कशी करावी याविषयी त्यांनी मुक्तचिंतनातून सर्वांसमोर माडले. प्रशांत पवार यांनी व्यायाम व योगाचे महत्व सांगत सकाळी अतिशय सुंदररित्या सर्वांकडून व्यायाम व योग प्राणायाम करून घेतले.
मा. उमेश शिंदे यांनी (स्वपरिचय ) या सत्रातुन स्वतःची ओळख कशी करून दयावी याविषयी सांगितले अशाप्रकारे विविध विषयांवर वैचारिक मांडणी झाली.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी जीवन संवर्धन फाउंडेशन मुंबई येथील प्रमुख सदाशिवराव चव्हाण हे उपस्थित होते. तसेच संस्थेचे सचिव डॉ. नितीन पंचभाई संस्थेचे पदाधिकारी  ललितकुमार पाठक, सुखदेव माळी, धनराजजी कातोरे, केदारनाथ कवडीवाले, बळवंत निकुम, ॲड. संजय पुराणिक हे उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रमुख म्हणून प्रा. संजय पाटील  हे  उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक आश्रमशाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक  प्रमोद सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन  दीपक महाजन  व नरेंद्र मराठे  यांनी केले होते. तसेच माध्यमिक मुख्याध्यापक  प्रवीण सोनवणे यांनी आभार व्यक्त केले.
बातमी शेअर करा
Previous Post

श्री. संत सेना नाभिक शिक्षण समितीतर्फे शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती वितरण

Next Post

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नऊ वर्षात झाला कायापालट : खा.डॉ. हीना गावीत

Next Post
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नऊ वर्षात झाला कायापालट : खा.डॉ. हीना गावीत

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नऊ वर्षात झाला कायापालट : खा.डॉ. हीना गावीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add