म्हसावद l प्रतिनिधी
श्री. संत सेना नाभिक शिक्षण समिती शहादा व नंदुरबार विभाग यांच्या विद्यमाने शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती वितरण आणि सेवानिवृत्त समाज बांधवाचा सत्कार समारंभ शहादा येथे संपन्न झाला
श्री.संत सेना नाभिक शिक्षण समिती तर्फे समाजातील हुशार ,होतकरू व गरजू विद्यार्थांनसाठी शैक्षणिक साहित्य व मातृ पितृ हरपलेल्या पाल्याना शिष्यवृत्ती वितरण आणि सेवानिवृत्त समाज बांधवाचा सेवापूर्ती सत्कार समारंभ श्री संत सेना नाभिक समाज भवन येथे पार पडला. या वेळी समाजाचे अध्यक्ष उद्धव मक्कन जांभळे हे होते.श्री संतसेना शिष्यवृत्ती वितरण सहकार अधिकारी घनशाम हनुमंतराव बाग एक्झिक्यूटीव्ह ऑफिसर , फार्मासिटयूकल्स कंपनी,बडोदा धनंजय जगन्नाथ राऊत यांचा तर्फे करण्यात आले.
तसेच सायकलचे वितरण मुकेश प्रताप कापुरे सचिव ग्रामसेवक संघटना तळोदा , शैक्षणिक साहित्य वितरण प्रमुख अतिथी समाजाचे उपाध्यक्ष नगिन मगन सोनवणे व दिलीप गोविंद साळूके याच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सहायक आयुक्त पशुसवर्धन डॉ .किशोरकुमार लालचंद सामुद्रे होते.तसेच सेवानिवृत्त समाज बांधव डॉ. प्रा. उद्धव मगन जाधव ,सौ मायबाई सोनवणे , दिलीप तुकाराम पवार , दिलीप गोरख जाधव, यशवंत बाबुराव होळकर , भिला सखाराम सोलंकी यांचा सत्कार प्राध्यापक डॉ.रविंद्र भटू मराठे यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, अशोक भबुता सोनवणे. ( माजी अध्यक्ष) . प्रकाश हिरजी जाधव (कोषाध्यक्ष) , परमेश्वर जाधव चव्हाण (सचिव) , विजय हरीश परमाळकर (सहसचीव) , भरत दगडू सोनवणे (प्रसिद्धी प्रमुख) संजय मक्कन जाभळे (चेअरमन संतसेना नाभिक कारागिरांची सहकारी संस्था) ज्ञानेश्वर बाबू जाधव हे होते. त्या वेळी कार्यक्रम यशश्वितेसाठी शिक्षण समितेचे अध्यक्ष प्रा .सुभाष शंकर सोनवणे, उपाध्यक्ष अजितेम भरत सोनवणे , सुचिता भटू पवार, सचिव अशोक मक्कन जाधव , सहसचिव रमण पुजरु सोनवणे ,कोषाध्यक्ष हरीश सुभाष सोलंकी , पुरुषोत्तम जग्गन्नाथ कन्हैया, रविंद्र दगडू जाधव , तसेच शिक्षण समितेचे सर्व संचालकांनी परिश्रम घेतले.








