खरीप हंगाम 2023-2024 साठी जिल्हास्तरावर निविष्ठा, बियाणे, खते व किटकनाशके या संदर्भात शेतकऱ्यांना येणाऱ्या तक्रार, अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राकेश वाणी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाण्याची खरेदी करावी, बियाणे खरेदीची पावती, खरेदी केलेल्या बियाणे पाकिटाचे टॅग व लॉट क्रमांक पडताळून पाहावे. पेरणी झाल्यावर बियाणे पाकिट पीक निघेपर्यंत सांभाळून ठेवावे, शेतकऱ्यांनी अनधिकृत बियाण्याची खरेदी करु नये, कीटकनाशके, तण नाशकांची खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणेची पाकीटे सिलबंद, मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटावरची अंतीम मुदत पाहूनच बियाणे घ्यावीत.
कमी वजनाच्या कृषि निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा तक्रारी विषयी माहिती प्रत्यक्ष, दूरध्वनी, ईमेल, एसएमएस इत्यादी जवळच्या कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांशी किंवा जिल्हास्तरीय तक्रार नियंत्रण कक्षातील जे.एस.बोराळे, मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार भ्रमणध्वनी क्रमांक 9359559680 ईमेल adozp@gmail.com, एन.डी.पाडवी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक, जिल्हा कृषि अधिकारी कार्यालय,नंदुरबार भ्रमणध्वनी क्रमांक 9423959715 तसेच डी.एस.बाविस्कर, टिप्पणी सहायक भ्रमणध्वनी क्रमांक 9623810798 dsaondb@gmail.com यांच्याशी संपर्क साधावा.
तसेच कृषि निविष्ठाविषयी असलेल्या अडचणी, तक्रारी व मार्गदर्शनासाठी कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002334000 वर संपर्क साधावा, असे आवाहनही कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.