Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विविध उपक्रमांनी संत भिमा भोई जन्मोत्सव उत्साहात साजरा

team by team
May 28, 2023
in राज्य
0
विविध उपक्रमांनी संत भिमा भोई जन्मोत्सव उत्साहात साजरा
नंदुरबार l प्रतिनिधी
संत भिमा भोई जन्मोत्सवानिमित्त प्रतिमा पुजन, विविध क्रीडा स्पर्धा तसेच नेत्र तपासणी शिबिर, वृक्षारोपण, रोप वाटप तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. समस्त नंदुरबार जिल्ह्यातील भोई समाज बांधवांनी संत भिमा भोई जयंती उत्साहात साजरी केली.
यात नंदुरबार शहरातील जन्मोत्सवात नेत्र तपासणी शिबिराला १२५ वृद्ध समाज बांधवांनी तपासणी केली.
यावेळी समाजातील वृद्ध महिलांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे नंदुरबार उपनगर परिसरात विविध वसाहतींमध्ये १०० फळ झाडे लावण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नितीन जगताप यांनी शंभर फळझाडे उपलब्ध करुन दिली. दि.२४ मे रोजी ५५ युवकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. यावेळी भाजपा नेते डॉ.विक्रांत मोरे यांनी स्वतः रक्तदान करुन शिबिरास सुरुवात केली. दि.२१ ते २५ मे पर्यंत पहाटे योग प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर समाज बांधवांनी सहभाग घेतला. दि.२२ मे रोजी लहान मुलांकरीता विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात दोनशेहून अधिक मुलांनी सहभाग नोंदविला. दि.२५ मे रोजी महिलांकरीता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग नोंदविला.
दि.२५ मे रोजी संत भिमा भोई यांचे प्रतिमेेचे पुजन आदिवासी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेद्रकुमार गावीत समवेत माजी जि.प.उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी उप नगराध्यक्ष रविंद्र पवार, रसिकलाल पेंढारकर, पुरुषोत्तम काळे, संतोष वसईकर, मदन मोरे, अरुण बेंद्रे, सुनिल मोरे, रमेश खेडकर, बाबुलाल मोरे आदी उपस्थित होते. यानंतर शोभायात्रेस सुरुवात झाली. शोभायात्रेत संत भिमा भोई यांच्यावर आधारीत संगितमय गाणी व ढोल-ताशांच्या गजरात नंदुरबार शहरातील संजय नगर येथून प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी आ.शिरीष चौधरी, नगरसेवक गौरव चौधरी, किरण चौधरी, भाजपा संघटक सचिव निलेश माळी आदी प्रतिष्ठीत नेते मंडळी व समाज सेवक उपस्थित होते.
गावातील प्रमुख चौका-चौकात शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर महिलांसह युवक व बालकांची उपस्थिती होती. शोभायात्रेची सांगता मोठा मारुती येथे महाप्रसाद वाटप करुन झाली. जन्मोत्सव यशस्वीतेसाठी संत भिमा भोई जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विक्की नुक्ते, उपाध्यक्ष अजय साठे, सचिव ऍड.प्रकाश भोई, उपसचिव सुरेश वाडीले, राष्ट्रीय सदस्य रामकृष्ण मोरे, जितेंद्र भोई, राजेंद्र खंडू भोइर्, डॉ.गणेश ढोले, पंकज खेडकर, संजय साठे, पंकज शिवदे, तुकाराम मोरे, जगदिश साठे, मोहन ढोले, भास्कर भोई, मनोहर जावरे, सागर कन्हेरे, पावबा रामोळे, तुषार (तिलक)  भोई आदींनी विशेष परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर संजय गांधी निराधार समितीच्या तालुकाध्यक्ष पदी अमृत गावित, भरत गावित यांनी केला सत्कार

Next Post

ब्रेकिंग न्यूज: अविनाश माळी यांची भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

Next Post
ब्रेकिंग न्यूज: अविनाश माळी यांची भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

ब्रेकिंग न्यूज: अविनाश माळी यांची भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add