नवापूर l प्रतिनिधी
संजय गांधी निराधार समितीच्या नवापूर तालुकाध्यक्ष पदी अमृत गावित व सदस्य पदी भालचंद्र गावित यांची नियुक्ती झाल्याबद्दल आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गिरीष गावित यांनी अमृत गावित व भालचंद्र गावीत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करत अभिनंदन केले.
तसेच नवापुर तालुक्यातील व नवापुर शहरातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेची माहिती , योजनेचे फार्म व इतर काही अडचणी असतील त्यांचे निराकरण करण्यासाठी नवापुर शहरातील सुमाणिक कॉम्प्लेक्स (एस.टी. डेपो जवळ ) या ठिकाणी सुमाणिक जनसेवा कार्यालय स्थापन करण्याचे भरत गावित यांनी समितीच्या तालुकाध्यक्ष अमृत गावित व सदस्य भालचंद्र गावित यांना सांगितले. लवकर त्या ठिकाणी कार्यालय सुरू करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे असे देखील सांगितले.
या प्रसंगी धनंजय गावित, एजाज शेख, अय्युब गावित, कणिक गावित, जेण्या गावित, जयवंत जाधव, सुका गावित,हेमंत जाधव , पमा सैय्यद आदी उपस्थित होते.