नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाण आहे हजारो नागरिक नंदुरबार शहरात शासकीय कामा निमित्त येत असतात तसेच नंदुरबार शहराचा दिवसें दिवस विस्तार वाढत आहे. त्या सोबतच लोकवस्ती हि विस्तृत होत आहे त्या अनुषंगाने सिटी बस सुरु करण्यात यावी अशी मागणी संकल्प निर्माण फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे.
गेल्या ३० वर्षा पूर्वी नंदुरबार हे तालुक्याचे ठीकान होते व शहराचा विस्तार हि कमी होता तेव्हा नंदुरबार नगर पालीकेच्या माध्यमातून सी टी बस सुरु होती काही तान्त्रिक अडचणीमुळे सी टी बस बंद पडली परतू आजची वर्तमान परीस्थिती पाहता नंदुरबाराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यात प्रामुख्यानी जिल्हाधीकार्यालय, जिल्हारुग्णालय , पोलीस अधीक्षक कार्यालय, समाज कल्याण ऑफिस, आर टी ओ ऑफिस, जिल्हा परिषद, जिल्हा न्यायालय अशा विविध शासकीय कार्यलय मुख्य्शहराचा ३ ते ४ कि मी अंतरावर आहे तसेच शहरातील सी बी पेट्रोल पम्प, करण चौफुली जेतवन बुद्धविहार, जगताप वाडी, खोडाई माता मंदिर दंडपानेश्व्र धुळे चौफुली , कोकणी हिल परिसर तसेच शहराच्या मध्यवर्ती भाग मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे.
त्यामुळे नागरिकाना अडचणी चा सामना करावा लागतो तरी नागलीकांची गेर सोय होऊ नये व आर्थिक दृष्ट्या देखील लोकांना त्यांचा फायदा होईल त्या मुळे गरीब श्रीमंत सर्वच घटकाला सोयचे होऊन नंदुरबार नगर पालिकेच्या महसुलात देखील वाढ होईल त्याच प्रमाने शाळा महाविद्यालयातील विविध शिक्षण शेत्रातील विध्यार्थी विध्यार्थीना सोयचे होईल त्यासाठी सिटी बस सुविधा महत्वाची ठरणार आहे .
संकल्प निर्माण फाउनडेशनच्या वातीने आपणास दिलेल्या निवेदानाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर सी टी बस नंदनगरीतील जनतेसाठी सुरु करावी आशी मागणी सुनील महिरे नंदू बैसाणे, राहुल निकम ,सुरेश जावरे ,बिरजू बैसाणे, पावबा महिरे धर्मराज जितेंद्र गव्हाने करनकाळ, पराग जगदेव, राहुल साळवे, राहुल ढोडरे, , राजेश बैसाणे, सुनील निकुंभे, राजू महाले, बापू सैंदाणे शुभम महिरे ,प्रीतेश पानपाटील, आदींनी केले आहे