धडगांव l प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील हरणखुरी गावांतील पाटीलपाडा येथे लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आहे. आदिवासी जनजागृती टीमचा (उलगूलान फाऊंडेशन) पुढाकार व आरोग्य विभागाचे सहकार्य मुळे 216 लोकांचे लसीकरण झाले.
लसीकरणासाठी हरणखुरी,भुजगांव सूरवाणी व जमानवाई या गावातील नागरिकांनी सहभाग घेत लसीकरण करून घेतले. दिवसभर जोरदार पाऊस सुरू असुन देखील लोकांच्या उत्साह कमी झाला नाही. लसीकरण शिबिरात आदिवासी जनजागृती टीमने मास्क, चहा बिस्कीट व साबण वाटप केले लोकांना मदतीसाठी हेल्प डेस्क लावले. तसेच ‘ लसीकरण रथ ‘ चालवून लसीकरण केंद्रापर्यंत येण्या-जाण्याची सोय केली. शिबिराच्या निमित्ताने उपस्थित नागरिकांना आदिवासी जनजागृतीने तयार केलेले स्थानिक भाषेतील शॉर्ट फिल्म व अवेअरनेसचे शॉर्ट विडिओ दाखविण्यात आले. या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश वळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. मालती ठाकरे (प्रा. आ. केंद्र, खुंटामोडी) MPW देवराम वळवी, परिचारिका श्रीमती पी. टी. तोरडे , गोकुळ गंगातेरे, आर. बी. सोनवणे, आर. के. सोनार जि. प. शाळेचे शिक्षक श्री. भंडारी, आशासह आरोग्य विभागाची टीम उपस्थित होती. शिबिर यशस्वीतेसाठी आदिवासी जनजागृती टीमने (उलगूलान फाऊंडेशन) परिश्रम घेतले.