नंदुरबार | प्रतिनिधी
तळोदा येथील अनाथालयातील दोन अल्पवयीन मुलांना फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे . याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , तळोदा येथील अनाथालयात असलेल्या १४ व १५ वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलांना दि . १८ सप्टेंबरच्या ११.३० ते १ ९ सप्टेंबरच्या पहाटे ५.३० च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले . याबाबत शिंगावे ता.शिरपूर येथील बालगृहाचे अधीक्षक संदीप भामरे ह.मु.खान्देशी गल्ली , तळोदा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा करीत आहेत .