नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार विधानसभेसाठी इंजि.किरण तडवी यांनी काँग्रेसतर्फे एक व अपक्ष एक असे दोन नामांकन दाखल केले आहे.
उद्योजक इंजि.किरण तडवी हे अनेक दिवसांपासून नंदुरबार विधानसभा लढवणार याबाबत चर्चा रंगली होती. आज अखेर त्यांनी काँग्रेसतर्फे एक व अपक्ष एक असे दोन नामांकन दाखल केले आहे.यावेळी माजी नगरसेवक रविंद्र पवार, प्रफुल खैरनार, राजेंद्र पाटील, किरण सैंदाणे आदी निवडक कार्यकर्त्यांसोबत जाऊन कुठलाही बडे जाव न करता उमेदवारी दाखल केली.सूचक म्हणून राजेंद्र पाटील यांची स्वाक्षरी आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, मी नंदूरबार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही केवळ उमेदवारी नसून परिवर्तनाच्या दिशेने उचललेलं एक ठोस पाऊल आहे. नंदूरबार विधानसभा मतदारसंघातील माझे प्रत्येक नागरिक, माझे साथीदार, आणि माझे कार्यकर्ते हे परिवर्तनाच्या या महान लढाईत माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे आहेत. माझ्यावर असलेला त्यांचा प्रचंड विश्वास, त्यांची साथ, आणि त्यांच्या भविष्याचा विकास साधण्याचा जो निर्धार आहे, त्यावर मला अखंड विश्वास आहे. आपल्या संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला प्रगतीची नवी दिशा देण्यासाठी, लोकशाही मूल्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी, आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी हे निवडणुकीचं रण आहे. नंदूरबारच्या जनतेचा आत्मविश्वास आणि संघर्षाची प्रेरणा मला सतत पुढे घेऊन जाईल, आणि यामध्ये आपण सर्वजण मिळून नवा इतिहास रचणार आहोत, याची मला खात्री आहे असे इंजि.किरण तडवी यांनी सांगितले.