Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार शहरातील सुशोभिकरणांवर चालला बुलडोझर

team by team
May 6, 2023
in राजकीय
0
नंदूरबार शहरातील सुशोभिकरणांवर चालला बुलडोझर

नंदुरबार l प्रतिनिधी

 

नंदूरबार शहरातील प्रमुख रस्त्यांसह विविध चौफुलींवर सुशोभिकरणांमुळे मोठ्या प्रमाणावर रस्ता व्यापले जात असून वाहतूकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत या बांधकामावर काल बुलडोझर चालला. त्या कामाचे आकार लहान ठेवून सुशोभिकरण तसेच ठेवण्यात येणार असल्याचे पालिका सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

 

नंदुरबार पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारीपदी पुलकीत सिंह यांनी कार्यभार घेतल्यानंतर त्यांनी शहरातील अनाधिकृत बांधकामांवर हातोडा घालत अतिक्रमण हटविण्याचा सपाटाच लावला असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक ठिकाणी असलेले अतिक्रमण मुख्याधिकारी पुलकीत सिंह यांनी हटविले आहे. दरम्यान, असे असले तरी नंदुरबार शहरातील धुळे चौफुली, करण चौफुली, नवापूर चौफुली येथे शहरवासियांसाठी आकर्षण ठरणाऱ्या चौफुलींवर सुशोभिकरण करण्यात आले होते.

 

 

मात्र, या सुशोभिकरणामुळे मोठ्या प्रमाणावर रस्ता अडविला जात होता. अवजड वाहनांना वाहने नेतांना कसरत करावी लागत होती. तर बऱ्याचदा अपघाताची शक्यता होती. सदरची बाब लक्षात घेवून वाहतूक समस्या निर्माण होवू नये यासाठी सुशोभिकरणावरील या बांधकामावर काल मुख्याधिकारी पुलकीत सिंह,बांधकाम अभियंता गणेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडोझर चालविण्यात आले. सुशोभिकरण तसेच ठेवून सुशोभिकरणालगत रस्ता व्यापणारे बांधकाम जमिनदोस्त करण्यात आले आहे. दरम्यान, यानंतर पुन्हा दुरुस्ती करुन सुशोभिकरण तसेच राहणार आहे.

 

 

चौफुलींवरील बांधकाम कमी करतांना लोकांच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेवून वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्याचे नियोजन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, चौफुलींवर बांधकामावर जेसीबी चालत असल्याचे पाहून अनेक नागरिकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.

 

 

गेल्या काही वर्षांपूर्वी नंदुरबार पालिकेच्याच वतीने शहरातील चौफुलींचे सुशोभिकरण करत आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या चौफुलींवर हे बांधकाम पूर्णपणे उदद्धवस्त होते की काय? अशीच भिती अनेकांकडून व्यक्त केली जात होती. तर नेमके सुशोभिकरणावर जेसीबी का चालविला जात आहे? याबाबत सुरुवातीला अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, वाहतूकीचे नियोजन करण्यासाठी सुशोभिकरण तसेच ठेवून रस्ते व्यापणारे बांधकाम निष्काषित करण्यात आले आहे. मुख्याधिकारी पुलकीत सिंह त्यांच्या कार्यकाळात आणखी नेमके कोणत्या बांधकामावर हातोडा चालवतात? व शहर विकासाच्यादृष्टीने आणखी कोणते निर्णय होतात? याकडे मात्र आता लक्ष लागून आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मध्यान्ह भोजन योजनेची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात करणार : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post

खांमगाव शिवारात तिहेरी अपघातात एक ठार, एक जखमी

Next Post
खांमगाव शिवारात तिहेरी अपघातात एक ठार, एक जखमी

खांमगाव शिवारात तिहेरी अपघातात एक ठार, एक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

July 17, 2026
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

July 17, 2026
इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add