Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काय सांगता भाडेकरूच निघाला चोर, नंदुरबारातील 9 लाखांच्या घरफोडीची अवघ्या काही तासात उकल

team by team
May 5, 2023
in क्राईम
0
नंदुरबार : घरफोडीचा गुन्हा अवघ्या 8 तासात उघड, दोन लाखांचा मुद्देमालासह एकास अटक
नंदुरबार । प्रतिनिधी
शहरातील पटेलवाडी परिसरात झालेली 9 लाख रुपयांची घरफोडी फिर्यादीनेच केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्याच्याकडून संपुर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची पथकानेही ही कारवाई केली आहे.
 याबाबत अधिक माहिती अशी की, दि.2 ते 4 मे दरम्यान शेख युसुफ शेख चांद (वय53,रा.प्लॉट नंबर-115 पटेलवाडी, नंदुरबार) यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात आरोपीने घरातील कपाटामधून 8 लाख 97 हजार 250 रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले. म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्यासह इतर पोलीस अधिकार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्याचवेळी शेख युसुफ शेख चांद यांच्या घरात भाडेकरु म्हणून 3 वर्षापासून राहत असलेले जुबेर इब्राहिम शहा याने देखील त्यांच्या राहत्या घरात चोरी झाल्याबाबत सांगितल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले.
जुबेर शहा यांच्या घरात झालेल्या घरफोडीच्या घटनास्थळाची श्री.पाटील पाहणी करीत असतांना जुबेर शहा यांना काही प्रश्न विचारण्यात आले असता, ते घरात चोरी झाल्याचा बनाव करीत असल्याचा संशय आला. म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथक तयार करुन जुबेर शहा यास सखोल विचारपूस करण्याचे आदेश दिले.
 पथकांनी जुबेर इब्राहीम शहा विचारपुस केली असता तो सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यानंतर मात्र त्यानेच चोरी केल्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेला 8 लाख 97 हजार 250 रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम मुद्देमाल देखील त्याच्याच घरातून काढुन दिला. सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गंभीर गुन्हा अवघ्या काही तासात उघड करुन उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकास पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी रोख बक्षिस जाहीर केले.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक सागर आहेर, पोलीस नाईक राकेश मोरे, भटु धनगर, पोलीस अंमलदार अभय राजपुत, योगेश जाधव यांच्या पथकाने केली.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामांमध्ये अपहार, कारवाईची मागणी

Next Post

नंदूरबार येथील द्वारकाधिश नगरात घरफोेडी ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

Next Post
नंदुरबार : घरफोडीचा गुन्हा अवघ्या 8 तासात उघड, दोन लाखांचा मुद्देमालासह एकास अटक

नंदूरबार येथील द्वारकाधिश नगरात घरफोेडी ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026
जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

July 18, 2026
राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

July 17, 2026
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

July 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add