Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामांमध्ये अपहार, कारवाईची मागणी

team by team
May 5, 2023
in राजकीय
0
नवापूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामांमध्ये अपहार, कारवाईची मागणी
नवापूर । प्रतिनिधी
तालुक्यातील 244 रस्त्यांच्या कामांमध्ये 35 कोटी 54 लाख 90 हजारांच्या निधीपैकी काही रस्त्यांची कामे न करता अपहार  झाला आहे. त्याची निःपक्षपणे तत्काळ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी यांच्याकडे पंचायत समिती सभापती बबिता गावीत यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनाद्वारे केली.
निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, नवापूर तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनाही देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष सन 2022-23 मधील नवापूर तालुक्यातील 3054 योजने अंतर्गत 244 रस्त्यांची कामे मंजूर झाली होती. या कामासाठी शासनाने 35 कोटी 54 लाख 90 हजारांचा निधी मंजूर केला होता. तालुक्यात सदर कामे जिल्हा परिषदेचे बांधकाम अधिकारी व त्यांचे संबंधित ठेकेदार यांनी केली. रस्त्यांची काही कामे केली, काही अर्धवट केली, मात्र त्यातही कामाचा दर्जा अत्यंत नित्कृष्ठ आहे.
याबाबत स्थानिक नागरिक वारंवार तक्रार करत आहेत. काही कामे केवळ कागदोपत्री झाल्याचे निदर्शनास आले आहे. रस्त्यांची काम न करता परस्पर निधीचा अपहार झाल्याचे दिसून येते. मंजूर विकास कामे प्रत्यक्षात न करता कामांचे 35 कोटी 54 लाख 90 हजारापैकी बहुतांश प्रशासकीय निधीचा परस्पर अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. नवापूर तालुक्यातील 3054 अंतर्गत योजनेचा गावनिहाय 244 कामांची यादी सोबत जोडलेली आहे. त्या गावांची निपक्षपणे तत्काळ सखोल चौकशी करावी अशी मागणी सभापती बबिता गावीत यांनी केली आहे.
निवेदन देतांना पंचायत समिती सभापती बबिता गावीत, उपसभापती शिवाजी गावीतसरपंच आर.सी.गावीत, पं.स.सदस्य दशरथ गावीत, धारसिंग गावीत, चांदूलाबाई वसावे, नरेंद्र गावीत, काँग्रेस तालुकाध्यक्ष जालमसिंग गावीत, करणसिंग गावीत, संतोष गवळी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा कारागृहात १०० कैद्यांची आरोग्य तपासणी

Next Post

काय सांगता भाडेकरूच निघाला चोर, नंदुरबारातील 9 लाखांच्या घरफोडीची अवघ्या काही तासात उकल

Next Post
नंदुरबार : घरफोडीचा गुन्हा अवघ्या 8 तासात उघड, दोन लाखांचा मुद्देमालासह एकास अटक

काय सांगता भाडेकरूच निघाला चोर, नंदुरबारातील 9 लाखांच्या घरफोडीची अवघ्या काही तासात उकल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add