Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार,शहादा शहरांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत खर्च करावा : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Mahesh Patil by Mahesh Patil
May 4, 2023
in राजकीय
0
नंदुरबार,शहादा शहरांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत खर्च करावा : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

 

नंदुरबार व शहादा नगरपालिकांना महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान व जिल्हा वार्षिंक योजनेतून मंजूर झालेला निधी विहीत वेळेत खर्च करण्याच्या सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आज दिल्या आहेत.

 

नंदुरबार नगरपरिषदेत आज पालकमंत्री डॉ.गावित यांनी नंदुरबार व शहादा नगरपरिषद व पालिकांच्या नविन प्रस्तावित कामांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस खासदार डॉ.हिना गावित, नंदुरबार न.प. मुख्याधिकारी पुलकित सिंह, शहादा नगरपालिकेचे स्वप्नील मुधलवाडकर आदी उपस्थित होते.

 

यावेळी मंत्री डॉ.गावित म्हणाले की, राज्य शासनाकडून तसेच जिल्हा वार्षिंक योजनेतून नगरपरिषदांना 115 कोटी रुपयांचा निधी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला असून मंजूर कामांचे अंदाजपत्रके, नकाशे, तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यतेचे प्रस्तावांना त्वरीत मंजूरी देवून हा निधी विहीत वेळेत खर्च करावा. नंदुरबार व शहादा नगरपालिका हद्दीतील जुन्या वसाहतींच्या ठिकाणी नवीन रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. ज्या भागात रस्ते, वीज, गटारी व पिण्याच्या पाणी उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी नागरिकांना सर्व मुलभूत सोई-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.

 

 

नाविण्यपूर्ण योजनेतंर्गत रस्ते व डि.पी रोडची प्रस्तावित कामे त्वरीत करावीत. पालिकेच्या मोकळ्या जागेत वाचनालय, युवक माहिती केंद्र, अभ्यासिकांची बांधकामे करावित. आदिवासी उपयोजनेत तसेच अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेत मंजुर निधींची कामे करतांना ज्या भागात यासमुहांची लोकवस्ती असेल अशाच ठिकाणी निधी खर्च करण्यात यावा.

 

नागरिकांच्या सुरक्षितेसाठी नंदुरबार, शहादा शहरातील सीसीटीव्ही प्रणाली लावण्यासाठी आराखडा तयार करावा. तसेच नंदुरबार व शहादा शहरातील महत्वांच्या ठिकाणी सिंग्नल व पार्कींगची व्यवस्था करण्यासाठी आराखडा तयार करावा यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. बैठकीस नगरपालिका शाखेचे अधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार पोलीसांनी अवघ्या दोनच दिवसात रोखला दुसरा बालविवाह

Next Post

महामार्गावर भीषण अपघात एक ठार, आठ जण जखमी

Next Post
महामार्गावर भीषण अपघात एक ठार, आठ जण जखमी

महामार्गावर भीषण अपघात एक ठार, आठ जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कृउबास सभापतीपदी दीपक मराठे तर उपसभापती विजय पाटील बिनविरोध

कृउबास सभापतीपदी दीपक मराठे तर उपसभापती विजय पाटील बिनविरोध

June 21, 2025
जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

June 21, 2025
मोदीजींच्या प्रेरणेमुळेच जगभरात योगाभ्यास सुरू झाला : डॉ. हिना गावित यांचे वक्तव्य

मोदीजींच्या प्रेरणेमुळेच जगभरात योगाभ्यास सुरू झाला : डॉ. हिना गावित यांचे वक्तव्य

June 21, 2025
तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन

तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन

June 17, 2025
जिल्ह्यात 25 हजार विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवात उत्साहात स्वागत

जिल्ह्यात 25 हजार विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवात उत्साहात स्वागत

June 17, 2025
राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

June 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group