नंदुरबार | प्रतिनिधी
गुजरात राज्यातील सुरत मधील मोस्ट वॉन्टेड आरोपी मोहम्मद अश्रफ ईस्माईल नागोरी यास सुरत येथील एटीएस पथकाने नवापूर येथून दि.१९ सप्टेंबर रोजी अटक केली अशा बातम्या काही सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविण्यात आल्या होत्या परंतु सदर आरोपी हा नवापूर येथे कोठेही वास्तव्यास नव्हता व त्याच्याशी कोणाचाही संपर्क नव्हता याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि. १९ सप्टेंबर २०२१ रोजी सुरत येथील एटीएस पथकाने गुजरात राज्यातील सुरत शहरातील मोस्ट वॉन्टेड आरोपी मोहम्मद अश्रफ इस्माईल नागोरी यास नवापूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले आहे. परंतु या मागील पार्श्वभूमी वेगळेच आहे. ती अशी की आरोपी मोहम्मद आश्रम इस्माईल नागोरी याच्याविरुद्ध खंडणी अवैद्य शस्त्र बाळगणे व शरीराला विरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुरत शहरात दाखल असल्याने सुरत शहर लाल गेट पोलीस स्टेशन येथे संघटित गुन्हेगारी गुजर सिटी १९७ जानेवारी २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून सदर आरोपी हा फरार होता. फरार कालावधीत तो सौराष्ट्र धोराजी तहसील भागात काही दिवस वास्तव्यास होता. यानंतर पश्चिम बंगाल येथे तो पळून गेला होता. सदरची माहिती एटीएस पथकाला मिळाल्यानंतर त्याचा शोध घेतला असता याची माहिती आरोपीस मिळताच हावडा सुरत एक्सप्रेस नाही सदर आरोपी येत असताना नवापूर रेल्वे स्टेशनच्या हद्दीत त्याला ताब्यात घेण्यात आले व तेथून सुरत येथे नेण्यात आलं याबाबतची माहिती एटीएस पथकाचे सुरत येथील जबाबदार अधिकारी पोलीस निरीक्षक चेतन जाधव यांच्याकडून नवापूर पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये सोशल मीडिया वरील पोस्ट वर विश्वास ठेवु नये असे आवाहन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी केला आहे.