नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबारचे नुतन जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी आज दि.21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कार्यालयात जाऊन मावळते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या हस्ते पदभार स्विकारला.
नंदुरबार येथील पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांची दि.९ सप्टेंबर रोजी मुंबई शहर उपायुक्तपदी बदली झाली होती.त्यांच्याजागी कोल्हापूर येथील नागरी हक्क संरक्षण विभाग कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत हे गेल्या दोन वर्षापासून नंदुरबार येथे कार्यरत होते. राज्य शासनाने आयपीएस अधिकार्यांचे बदल्यांचे आदेश जारी केले होतेे. दरम्यान गणेशात्सव असल्याने उत्सवानंतर पदभार घेण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. गणेशात्सव शांततेत पार पडल्या नंतर आज दि.२१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नंदुरबारचे नुतन जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी पदभार स्विकारला. यावेळी मावळते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत पी.आर.पाटील यांचे स्वागत केले.