नंदुरबार l प्रतिनिधी
येथील सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजातर्फे श्री कालिका माता मंदिराच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.चैत्र नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते श्री कालिका देवी मूर्तीची आरती करण्यात आली.दरम्यान चैत्र नवरात्रोत्सव निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
रक्तदान शिबिराप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावितयांनी भेट देऊन महिलांचा उत्साह द्विगुणित केला.
शहरातील देसाईपुरा काका गणपती मंदिर परिसरात असलेल्या श्री कालिका माताा मंदिराच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी सकाळपासून पाठ वाचन व विविध धार्मिक उपक्रम झाले. रक्तदान शिबिरासाठी जनकल्याणरक्त संकलन केंद्राच्या टीमचे सहकार्य लाभले.श्री कालिका माता मंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात महिलांसह युवक आणि पुरुषांनी देखील सहभाग नोंदवून रक्तदान केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सो.क्ष. कासार समाज महिला मंडळ आणि नवयुवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कासार समाज बांधवांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी आयोजित महाप्रसादाचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला.








