नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव पाहता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव राऊ मोरे यांच्यामार्फत नंदुरबार शहरातील डासांचा प्रादुर्भाव असलेल्या भागात धूर फवारणी अभियानाची सुरवात केली आहे.
शहरात डासांचे प्रमाण अचानक वाढले आहे. संध्याकाळी डासांचे जथ्थेच्या जथ्थे घरात शिरत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पहाटे थंडी, दुपारी थोडा उन्हाचा कडाका कधी ढगाळ वातावरण शहरात पहावयास मिळत आहे. असे वातावरण डासांच्या उत्पत्तीस पोषक असल्याने शहरात डासांचे प्रमाण अचानक वाढले आहे. मात्र पालिका प्रशासन कीटकनाशक फवारणीविषयी उदासीन असल्याचे नागरिकांचा आरोप आहे.
शुक्रवार दि.१७ मार्च २०२३ पासून देसाईपुरा भिलाटी येथून या अभियानाची सुरवात करण्यात आली. पुढील ८ दिवस हे अभियान चालणार असून शहरातील ज्या-ज्या भागात या समस्या आहेत तेथे सदर फवारणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव राऊ मोरे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव राऊ मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नंदुरबार कार्याध्यक्ष कमलेश चौधरी, जितू ठाकरे, राजा ठाकरे, अजय पाडवी आदी उपस्थित होते. अभियानासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष लल्ला मराठे, लाला बागवान, राष्ट्रवादी युवक देसाईपुरा भिलाटी शाखा अध्यक्ष मुकेश ठाकरे, उपाध्यक्ष जय ठाकरे, सदस्य काशिनाथ ठाकरे, विद्यार्थी सेलचे शहराध्यक्ष जयंत मोरे यांनी परिश्रम घेतले.