नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील समशेरपुर येथे आयान साखर कारखान्याचे गाळप येत्या आठवड्यात बंद करण्यात येणार आहे. शेतकर्यांनी आपल्याकडे शिल्लक असलेला ऊस तातडीने कारखान्यात द्यावा, असे आवाहन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर टापरे यांनी केले आहे.
श्री. टापरे यांनी याबाबत सांगितले की, कारखान्याचे गाळप येत्या आठवड्यात बंद होईल. कार्यक्षेत्रातील ज्या ऊस उत्पादकांच्या ऊसाचे गाळप अद्याप झालेले नसेल, नोंदीचा, बिगर नोंदणीचा, रस्ता, कौटुंबिक अडचण तथा अन्य कारणाने गाळपास आला नसेल, अशा शेतकर्यांनी कारखान्याशी संपर्क साधावा. शेतकर्यांनी आपल्या शेतातील ऊस तोडून स्वतः वाहतूक करून कारखान्यापर्यंत आणावा. अन्यथा गाळप बंद झाल्यानंतर हा ऊस गाळपास घेतला जाऊ शकणार नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या होणार्या नुकसानीला कारखाना जबाबदार राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.