नंदुरबार l प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांना राजमाता आईसाहेब जिजामातांनी लहानपणा पासूनच श्रीराम प्रभू, चक्रधारी भगवान श्रीकृष्ण यांचे चरित्र शिकवले त्या चारित्र्या शिकवणीमुळेच छ. शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यची स्थपना केली आजचा पिढीनेही महाराजांसारखे आदर्श जीवन डोळ्यासमोर ठेवले तर रामराज्य येईल असे प्रतिपादन भागवताचार्या ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज यांनी केले.
ते हिंदु सेवा सहाय्य समिती आयोजित शिवजयंती निमित्त व्याख्यानात बोलत होते. व्यासपीठावर भागवताचार्य पंडित रविंद्र पाठक गुरुजी, हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक डॉ नरेंद्र पाटील उपस्थित होते.
ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंग श्रोत्यांसमोर ठेऊन आताचा काळात शिवचरित्राचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन तरुणांना जगण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून प्रेरणा मंत्राने करण्यात आली.
कार्यक्रमाचा उद्देश हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील यांनी मांडला सुत्रसंचलन सुमित परदेशी यांनी तर आभार प्रदर्शन राजू चौधरी यांनी मानले. मान्यवरांच्या सत्कार उज्वल राजपूत, जितेंद्र मराठे, गणेश राजपूत यांनी केला. कार्यक्रमाला माजी सरपंच अंबरसिंग पाडवी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते व्याख्यान यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक आणि समस्त रकासवाडे गावातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.