नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील ब्राह्मणवाडीत सदर शिबिर रोटरी क्लब ऑफ नंदनगरी, सावता फुले फाउंडेशन,समस्त ब्राह्मण पंच, बहुभाषिक ब्राह्मण समाज महासंघ, ज्येष्ठ नागरिक संघटना, नेत्र विभाग, जिल्हा शल्य चिकित्सालय नंदुरबार, स्मित हॉस्पिटल , यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर घेण्यात आले.यात २१० ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी बांधकाम सभापती दीपक दिघे, माजी शिक्षण सभापती गोपाळ शर्मा, ज्येष्ठ नागरिक संस्थाचे अध्यक्ष वसंत चौधरी, समस्त ब्राह्मण पंचचे अध्यक्ष अजित कुलकर्णी, डॉ. दीपक वसावे, डॉ. अक्षय बागुल, स्मित हॉस्पिटलचे शब्बीर मेमन, डॉ. शिंदे, डॉ.विशाल चौधरी तसेच बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे उदय जोशी, रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल शर्मा, सावता फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज गायकवाड, हे उपस्थित होते.
सदर शिबिरामध्ये नेत्र तपासणी, दंत तपासणी, मधुमेह, रक्तदाब व इतर आजारांची तपासणी मोफत करण्यात आली. याप्रसंगी चंद्रकांत रघुवंशी यांनी आरोग्याचे महत्त्व पटवून दिले व अशा प्रकारचे आयोजन या संस्थांमार्फत करण्यात येत आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानले. रोटरी क्लब अध्यक्ष नंदनगरी अनिल शर्मा यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मनोज गायकवाड यांनी तर आभार अजित कुलकर्णी यांनी मानले. सदर शिबिरांमध्ये २१० ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय शर्मा ,दिनेश शर्मा, राजेश शर्मा, राजू शर्मा, यादवराव पाटील, पोपट माळी, गुलाब माळी, राकेश शर्मा, शरद जोशी, जितेंद्र दीक्षित, भोंगे ,राजू शुक्ला ,यांनी परिश्रम घेतले.