Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्युज :यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या क्रूझर गाडीचा अपघात, चार ठार, ४४ जखमी

team by team
February 28, 2023
in क्राईम
0
ब्रेकिंग न्युज :यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या क्रूझर गाडीचा अपघात, चार ठार, ४४ जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी

 

खापर ता.अक्कलकुवा येथे सुरु असलेल्या यात्रोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांवर घेऊन जाणाऱ्या क्रूझर वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने भराडीपादर गावाजवळील नाल्यात वाहन कोसळून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन बालक व एक युवक असे चार जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ४४ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

 

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, खापर ता.अक्कलकुवा येथे अंबिका माता यात्रोत्सव सुरु आहे. दुर्गम भागातून यात्रेकरु या ठिकाणी येत आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील कुवा, मोगरा, ओढी, रतनपाडा तसेच कोठली आदी गावातील भाविक दि.२७ रोजी सायंकाळी ५.
३० वाजेच्या सुमारास खापरकडे यात्रेसाठी येत होते. कटांसखाई येथील वाहन चालक वेस्ता दिवाल्या वसावे हा त्याच्या ताब्यातील क्रुझर वाहनात (क्र.जी.जे.१६ झेड ५२०१) भाविकांना घेवून खापरकडे येत होता. वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त सुमारे ५० हून अधिक प्रवासी बसविलेले होते. असे असतांना वाहन चालक वेस्ता वसावे याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवीत असताना भराडीपादर गावाच्या उतारावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने क्रुझर रस्त्याच्या खाली असलेल्या खोल नाल्यात कोसळल्याने अपघात घडला.

 

 

 

 

या अपघातात दिनेश हात्या वसावे (वय १०), विलास रमोश पाडवी (वय १३), विलास राज्या वसावे (वय १४, तिघे रा.कटासखाई ता.अक्कलकुवा) व दिनेश बिज्या वसावे वसावे (वय २०,रा.कोठली ता.अक्कलकुवा) यांचा मृत्यू झाला. तर रंजिता सिपा पाडवी, सिपा काल्या पाडवी, शैलेश दमण्या पाडवी, अनसीबाई भिमसिंग वसावे, कालू दिवाल्या पाडवी, महेश नारसिंग पाडवी, निर्मला दमण्या पाडवी, पुर्वी दमण्या पाडवी, मुन्नी हाण्या पाडवी, निकिता पुण्या पाडवी, केजल लालसिंग वसावे, सुरेश नारसिंग वसावे, मसरा बामण्या पाडवी, अनिष्का हाला पाडवी, हात्या दिवाल्या पाडवी, रेवली जेठ्या वसावे, जेठ्या दिवाल्या पाडवी, सेवा रेहमा पाडवी, पुन्या ओल्या पाडवी, सुरेश नरशी वसावे, शांतीबाई वाहऱ्या वसावे, सिपा खादऱ्या पाडवी, रेतेश डाला वसावे, विलास रमेश पाडवी, विकास राला वसावे, जेवली जेठ्या वसावे, रविंद्र, रेमा बाला पाडवी, केजल नारसिंग वसावे सर्व रा.कटांसखाई ता.अक्कलकुवा,

 

 

 

कविता मांगा वसावे, प्रदिप मांगा वसावे, मांगा जालमा वसावे, गणेश ओल्या वसावे, मुन्नी दाखल्या राऊत, संजय रायज्या वसावे, कविता वनसिंग वसावे, सुमा लालसिंग वसावे, कविता मांगा वसावे, किसन बावा पाडवी, दातक्या सफा राऊत, अमरसिंग विज्या वसावे, लालसिंग विज्या वसावे सर्व रा.कुवा ता.अक्कलकुवा, खोली रोशा वसावे, ओली राजा वसावे दोन्ही रा.मोगरा ता.अक्कलकुवा व दिनेश डाला वसावे रा.ओढी ता.अक्कलकुवा, स्वाती मुनेश पाडवी रा.रतनपाडा ता.अक्कलकुवा असे सुमारे ४४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

 

 

दरम्यान, अपघात घडल्याचे माहिती कळताच स्थानिकांनी व पोलिस प्रशासनही घटनास्थळी पोहचले. जखमींना मिळेल त्या वाहनाने व रुग्णवाहिकेने अक्कलकुवा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यातील गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. अपघातानंतर वाहन चालक वेस्ता दिवाल्या वसावे हा घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत अमरसिंग बिज्या वसावे यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात वाहन चालक वेस्ता दिवाल्या वसावे याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७, ६६/१९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रितेश राऊत करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार पुणे रेल्वे सुरू होणार पण, पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक यांनी सांगितले कारण…

Next Post

हुंडा- रोषमाळ गावात एस.टी.बस सेवा पुन्हा सुरू

Next Post
हुंडा- रोषमाळ गावात एस.टी.बस सेवा पुन्हा सुरू

हुंडा- रोषमाळ गावात एस.टी.बस सेवा पुन्हा सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add