Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार पुणे रेल्वे सुरू होणार पण, पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक यांनी सांगितले कारण…

team by team
February 28, 2023
in राजकीय
0
नंदूरबार पुणे रेल्वे सुरू होणार पण, पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक यांनी सांगितले कारण…

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार रेल्वे स्थानकावर आढावा घेण्यासाठी पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अशोक कुमार मिश्रा आले होते. यावेळी खा.डॉ.हीना गावित यांनी विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करुन स्थानिक समस्या निदर्शनात आणून दिल्या.दरम्यान पुण्यासाठी रेल्वे सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशिल असून परंतु पुणे रेल्वे स्थानकात जागाच नसल्याने नंदूरबार हून रेल्वे सुरू करता येत नसल्याचे पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक यांनी यावेळी सांगितले दरम्यान, नंदुरबार रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी चौथ्या प्लॅटफार्मची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी रेल्वे सल्लागार समिती सदस्यांकडून करण्यात आली असून याबाबत महाप्रबंधकांना निवेदन देण्यात आले.

 

 

पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अशोक कुमार मिश्रा नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर आले होते. यावेळी त्यांनी रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत खा.डॉ.हीना गावित, डीआरएन निरज वर्मा यांच्यासह रेल्वे सल्लागार समितीतील सदस्य जवाहरलाल जैन, सुभाष पानपाटील, प्रशांत चौधरी, दुर्गेश राठोड, मिलींद मोहिते उपस्थित होते. यावेळी महाप्रबंधकांनी नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या तिघी प्लॅटफार्म, पादचारी पूल आदी ठिकाणांची पाहणी केली.

 

 

 

दरम्यान, खा.डॉ.हीना गावित यांनी महाप्रबंधक अशोक कुमार मिश्रा यांना स्थानिक पातळीवरील प्रवाशांना येणाऱ्या समस्यांबाबत माहिती देऊन चर्चा केली. याप्रसंगी रेल्वे सल्लागार समितीच्यावतीने महाप्रबंधकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार शहराच्या मध्यातून लोहमार्ग गेला आहे. यामुळे शहराचे दोन भाग झाले आहेत. बऱ्याचदा रेल्वे प्रवाशांना बाहेर निघण्यासाठी केवळ एकच प्लॅटफार्म उपलब्ध आहे. यामुळे रेल्वे स्थानकाच्या उत्तर दिशेला सर्व सोयी सुविधांयुक्त नवीन चौथ्या क्रमांकाचा प्लॅटफार्म निर्माण करण्यात यावा,

 

 

 

 

नंदुरबार रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म ओलांडण्यासाठी सुरतच्या दिशेला नवीन पादचारी पुल बनविण्यात येत आहे. मात्र तो केवळ प्लॅटफार्म १, २ व तीन पुरताच मर्यादीत आहे. यामुळे सदरचा पादचारी पूल स्टेशनच्या दोन्ही बाजूला बनविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग, जेष्ठ नागरिक, आजारी प्रवाशांसाठी लिफ्टची सुविधा निर्माण करण्यात यावी. नंदुरबार रेल्वे स्थानक परिसरात अंडर बायपासची निर्मिती करण्यात आली आहे.

 

 

 

मात्र पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतो. यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरत-पुरी, एकतानगर -महामना एक्स्प्रेसला थांबा देण्यात यावा. पुण्यासाठी स्वतंत्र रेल्वे सुरु करण्यात यावी. नवजीवन एक्स्प्रेस पुन्हा जुन्या वेळेवर सुरु करण्यात यावी. नंदुरबार रेल्वे स्थानकावर तिकिट रिझर्व्हेशनसाठी दोन खिडक्या असून दोन्ही सुरु ठेवण्यात याव्यात. तसेच मनमाड-इंदौर रेल्वे मार्गादरम्यान नरडाण्याहून धुळ्यासाठी लोहमार्गाची निर्मिती करुन प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

वाळूची ट्रक सोडविण्यासाठी ७० हजाराची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी यांना नंदूरबार तहसील समोरून रंगेहाथ अटक

Next Post

ब्रेकिंग न्युज :यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या क्रूझर गाडीचा अपघात, चार ठार, ४४ जखमी

Next Post
ब्रेकिंग न्युज :यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या क्रूझर गाडीचा अपघात, चार ठार, ४४ जखमी

ब्रेकिंग न्युज :यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या क्रूझर गाडीचा अपघात, चार ठार, ४४ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add