नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागातून तसेच प्रकाशा गावातून मोटरसायकल लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहादा व नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागातून दिक्षीत संजय दातीर, रा. शाहूनगर (नंदुरबार) यांची ३० हजार रूपये किंमतीची मोटरसायकल (क्र.एम.एच.३९- ए.ई. ३५६९) अज्ञात चोरटयांनी लंपास केली. त्यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक भटु धनगर करीत आहेत. तर दुसर्या घटनेत शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे राहणार्या अशोक रामदास सोनवणे यांच्या घराच्या अंगणातून अज्ञात चोरटयाने १५ हजार रूपये किंमतीची मोटरसायकल (क्र.एम.एच.३९-एस.९४८१) लंपास केली. याप्रकरणी अशोक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून प्रकाशा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार रामा वळवी करीत आहेत.








