Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यातील सर्व विद्यापिठांमध्ये आदिवासी वसतीगृह उभारणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

team by team
February 24, 2023
in राजकीय
0
राज्यातील सर्व विद्यापिठांमध्ये आदिवासी वसतीगृह उभारणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये भूखंड उपलब्ध झाल्यास तेथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह उभारणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते शहादा तालुक्यातील शहादा ,राणीपूर, गणोर ,सुलतानपूर ,मळगाव येथील शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा मुलींचे वसतिगृह व शालेय इमारतींच्या पायाभरणी कार्यक्रम तसेच जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मोहिदा,लोणखेडा, उंटावद ,म्हसावद येथील पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित,आमदार राजेश पाडवी, कृषी सभापती हेमलता शितोळे, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, प्रांताधिकारी महेश शेलार,गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, उप कार्यकारी अभियंता (आदिवासी) ए. पी.चौधरी, जि.प. सदस्य जिजाबाई ठाकरे, के.डी. नाईक,राजीव जाधव, गुलाब ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटिया, ईश्वर पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

ते पुढे म्हणाले, आदिवासी बांधवांना शिक्षण देणे हा तर शासनाचा हेतू आहेच परंतु त्याना सक्षम आणि समृद्ध करण्यासाठीही आदिवासी विकास विभागामार्फत आम्ही प्रयत्नशील आहोत. भविष्यात केवळ शासनाने अनिवार्य केलेले शिक्षणच नाही तर ज्याला ज्या विषयातले शिक्षण व प्रशिक्षण घ्यावयाचे आहे, ते आदिवासी विकास विभागामार्फत दिले जाईल. त्यासाठी गरजांवर आधारित सूचनांचे स्वागतच केले जाईल, असेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

 

 

आदिवासी करिअर अकादमी निर्माण करणार

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या विविध संधींमध्ये सहभागी होता यावे व प्रशासनात त्यांना करिअर करण्यासाठी राज्यात स्वतंत्र करिअर अकादमी निर्माण करण्यात येणार असून आठवीच्या वर्गापासूनच राज्यातील ५०० विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात येणार आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असेल स्वतंत्र क्रिडा अकादमी

आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उपजत काही अंगभूत क्रिडा व कलागुण असतात, त्यांच्या या उपजत व अंगभूत गुणांना प्रोत्साहन देवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू व कलावंत निर्माण करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत क्रिडा अकादमीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.यावेळी जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले.

दृष्टिक्षेपात

प्रत्येक विद्यापीठांत उभारणार आदिवासी वसतीगृहे.

शिक्षणासोबतच आदिवासी बांधवांना सक्षम व समृद्ध बनवणार.

स्पर्धा परिक्षेत आदिवासी मुले यशस्वी व्हावीत यासाठी करिअर अकादमी स्थापन करणार.

मागेल त्याला पाहिजे ते शिक्षण देणार.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असेल स्वतंत्र क्रिडा अकादमी.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार व प्रकाशा येथुन दुचाकी लंपास

Next Post

औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’, केंद्र सरकारची मंजुरी

Next Post
औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’, केंद्र सरकारची मंजुरी

औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’, केंद्र सरकारची मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add