नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हयातील सर्व न्यायालयातील तडजोडक्षम प्रलंबित फौजदारी, दिवाणी, मोटार अपघात दावे प्रकरणे,चलनक्षम धनादेश प्रकरणे, कौटुबिक वाद प्रकरणे व दाखलपुर्व प्रकरणांमध्ये वीज, पाणीपट्टी, घरपट्टी व बँका,श्रीराम फायन्सास,बी.एस.एन.एल यांचे थकीत बिले,ई-ट्रॅफिक चलन, यांची ३००० प्रकरणे शनिवार दि.११ फे ब्रुवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये आपसात तडजोडीने निकाली काढण्यात आली.यांत ४ कोटी ३८ लाख ११ हजार २२१ रुपये वसुल करण्यात आले.
सदर लोकन्यायालयाच्या प्रसंगी नंदुरबार मुख्यालयात तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ आर.जी.मलशेटटी, मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायधिश .व्ही.जी.चव्हाण,वरिष्ठ स्तर सह दिवाणी न्यायधिश व्ही.एन.मोरे ,वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायधिश.एस.टी.मलिये,कनिष्ठ स्तर व प्रथम श्रेणी सह दिवाणी न्यायधिश वाय.के.राउत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायधिश
डि.व्ही हरणे, उपस्थित होते.मदतीसाठी विधिज्ञ अॅड.एस.ए.कुलकर्र्णी , अॅड.पी.डी.बागुल,अॅड.सचिन पाटील,अॅड.एच.एम.गांंगुर्डे,अॅड.रश्मी
महाले,यांनी सदस्य म्हणुन काम पाहिले.तसेच सदर लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा न्यायालयातील प्रबंधक एच.व्ही.जोशी, वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. पी.बी. चौधरी, जिल्हा विधी प्राधिकरणचे अधीक्षक डी.पी.सैदाणे,न्यायालयीन कर्मचारी व विधिज्ञ यांनी मोलाचे सहकार्य केले.सदरच्या लोकन्यायालयात ३००० प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात येवून ४ कोटी ३८ लाख ११ हजार २२१ रुपये वसुल करण्यात आले. दिवाणी ,मोटार अपघात प्रकरणे, चलनक्षम धनादेश प्रकरणे ,कौटूंबिक वाद प्रकरणे, फौजदारी
प्रकरणे,भुसंपादन प्रकरणे,व इतर किरकोळ फौजदारीचे ४५७ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यात २ कोटी ७० लाख ६७ हजार ६०७ रूपये तर बॅक वसुली प्रकरणे, वीज थकबाकी वसुली प्रकरणे,पाणीपटटी,घरपटटी थकबाकी वसुली,बी.एस.एन.एल.ची २५४३ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यात १ कोटी ६७ लाख ४३ हजार ६१४ रुपये वसुल करण्यात आले.








