नंदुरबार l प्रतिनिधी
एस. ए. मिनिस्ट्रीज ट्रस्ट, संचलित एस.ए.मिशन हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नगरपरिषदेच्या नुतन इमारतीस भेट दिली, महाविद्यालयाच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रमामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ह्या पाठांतर्गत विद्यार्थ्यांना वर्गात शिकविण्यात येणाऱ्या पाठ्यक्रमातून सदर नगरपरिषदेचे कामकाज विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बघता यावे ह्या करिता शाळेतील नागरिकशास्त्र विषयाचे शिक्षक ललिता पानपाटील,सतिष सदाराव,विद्या सोनवणे, रोझलीन वळवी यांनी नंदुरबार येथील नूतन नगरपरिषदेच्या इमारतीस भेट दिली.
सामान्य प्रशासन विभाग, पाणीपुरवठा विभाग,कर वसुली विभाग, बांधकाम विभाग, अशा विविध विभागांना भेट देऊन त्यांच्या कामकाजाविषयी सविस्तर जाणून घेतले तसेच मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना,नंदुरबार शहराची लोकसंख्या 1,11037 एवढी असून नंदुरबार नगरपालिका ‘अ ‘ वर्ग नगरपालिका आहे या बाबत आणि राज्यकारभाराची माहिती देऊन नगरपालिकेतील नियोजन समिती, बांधकाम समिती, पाणीपुरवठा समिती, शिक्षण समिती, महिला व बालकल्याण समिती यांची विकासावर करण्यात येणारी कार्य संबंधित माहिती देण्यात आली तसेच माझी वसुंधरा ही प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेण्यात आली अशा पद्धतीने क्षेत्रभेटीला येणाऱ्या विद्यार्थ्यांना मा. मुख्याधिकारी अमोल बागुल व प्रशासन अधिकारी जयसिंग गावित यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.








