Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बसची ट्रॅक्टरला धडक, भीषण अपघातात २१ जण जखमी

team by team
February 10, 2023
in क्राईम
0
बसची ट्रॅक्टरला धडक, भीषण अपघातात २१ जण जखमी

सारंगखेडा l प्रतिनिधी

 

खैरवे शहादा बसचा सारंगखेडा शहादा रस्त्यावर अपघात झाल्याने विद्यार्थ्यांसह २१ प्रवासीसह चालक, वाहक जखमी झाले आहेत.या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

 

 

 

शहादा तालुक्यातील सारंगखेडा जवळील माँ सप्तश्रृंगी पेट्रोल पंपाजवळ शहादा दोंडाईचा रोडवर सकाळी १० वाजेच्या दरम्यान ट्रॅक्टर चा टायर फुटल्याने मागून येणारी बस ट्रॅक्टरला जोराने धडक दिल्यामुळे अपघात झाला आहे. खैरवे मुक्कामी असलेली बस नियमित वेळेनुसार आज सकाळी ६ वाजता खैरवे येथून शहादा कडे निघाली असता यात बहुतांशी शाळकरी विद्यार्थी असतात खास करून शालेय विद्यार्थ्यांसाठी ही बस मुक्कामी असते.

 

 

 

यात इतर प्रवासी देखील प्रवास करतात याच दरम्यान बस सारंगखेडा होऊन शहादा कडे जात असताना मा सप्तशृंगी पेट्रोल पंपाच्या काही अंतरावर शहाद्याकडे ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह उभा होता. ट्रॅक्टर रस्त्यावर उभे होते याच ट्रॅक्टरला बस ने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला यात विद्यार्थ्यांसह प्रवासी व वाहक चालक असे एकूण २१ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. जखमींवर सारंगखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांतीलाल पावरा, समुदाय आरोग्य अधिकारी राकेश पाटील,

 

 

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी. एम. पाटील, आरोग्य सहायिका, आरोग्य सहाय्यक कर्मचाऱ्यांनी तात्काळ जखमीवर उपचार केले. येथील सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी व सर्व पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. यांनी जखमींवर तात्काळ उपचार होण्यासाठी सहकार्य केले. आठ विद्यार्थ्यांना उपचार करून घरी सोडण्यात आले. त्याचबरोबर गंभीर दुखापत झालेल्या नऊ विद्यार्थ्यांसह प्रवासी वाहक आणि चालक यांना पुढील उपचारासाठी शहादा येथे पाठविण्यात आले आहे.

 

 

अपघाताची वार्ता कळताच टेंभा, सारंगखेडा, कळंबू, कुकावल, देऊर, खैरवे, भडगाव आदी परिसरातील पालकांनी सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले व आपल्या पाल्याची चौकशी केली.

 

सारंगखेडा ते शहादा या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने दररोज अपघाताची मालिका सुरू आहे दुरुस्तीच्या नावावर थातूरमातूर डागडुजी करून लोकांचे अतोनात हाल संबंधित विभागाकडून करण्यात येत आहेत. डिसेंबर महिन्यात या रस्त्याची डागडूजी करण्यात आली होती मात्र महिन्याभरातच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत नियमित अपघाताची मालिका सुरू असून याला जबाबदार कोण अशी विचारणा वाहनधारक करीत आहेत.

 

 

अपघातात वैष्णवी दरबार सिंग टेंभा, निहारिका आनंद सिंग गिरासे टेंभा, वर्षा विजय सिंग गिरासे टेंभा, प्रेम हिम्मत सिंग गिरासे देऊर, सोनल प्रेम सिंग गिरासे देउर, कल्याणी जितेंद्र गिरासे देऊर, हेमलता आनंद सिंग गिरासे देऊर, डोंगर फकीरा चित्ते टेंबा, नितीन बापू कुवर टेंभा, बस चालक गोरख गोपीचंद पेंढारकर वडाळी , देवेंद्र बंडू पान पाटील वाहक खैरवे,भडगाव, मोहित मुकेश जगताप देऊर, वेदिका नवनाथ कोळी टेंभा, सृष्टी बापू कुवर् टेंभा, साक्षी दीपक गिरासे टेंभा, चंद्रकांत रमेश जगताप देऊर, रिया विजय गिरासे टेंभा, वैष्णवी बापुजी कुवर टेंभा, यश किशोर गिरासे देऊर, लोकेश मुकेश जगताप देऊर, जयेश भारत जगताप देऊर जखमी झाले.

 

 

पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद वळवी करीत आहेत. अपघात प्रकरणी जाब जबाब नोंदवून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

चावरा स्कूल मध्ये वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा उत्साहात

Next Post

नंदुरबार येथे आदिवासी संघटनांतर्फे बोगस आदिवासींच्या विरोधात जनआक्रोश महामोर्चा

Next Post
नंदुरबार येथे आदिवासी संघटनांतर्फे बोगस आदिवासींच्या विरोधात जनआक्रोश महामोर्चा

नंदुरबार येथे आदिवासी संघटनांतर्फे बोगस आदिवासींच्या विरोधात जनआक्रोश महामोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add