Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे आदिवासी संघटनांतर्फे बोगस आदिवासींच्या विरोधात जनआक्रोश महामोर्चा

team by team
February 10, 2023
in राजकीय
0
नंदुरबार येथे आदिवासी संघटनांतर्फे बोगस आदिवासींच्या विरोधात जनआक्रोश महामोर्चा

नंदूरबार | प्रतिनिधी

नंदुरबार येथे आदिवासी बांधवांच्या विविध सामाजिक संघटनांतर्फे बोगस आदिवासी विरोधी निर्णय व धनगर आरक्षण तसेच आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र शासनाच्या विरोधात जन आक्रोश महामोर्चाचे काढण्यात आला होता.यावेळी मोर्चात हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते.यावेळी निवासी जिल्हाधिकारी सुधिर खांदे यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जमातीला शासकीय व निम शासकीय सेवेत दिलेल्या आरक्षणाचा लाभ. अनुसूचित जमातीचे नसलेले व्यक्ती बोगस आदिवासीच्या नावाखाली नोकरीमध्ये लाभ घेत असून. अशा नोकरदारांना महाराष्ट्र शासनाने वारंवार परिपत्रके काढून संरक्षण दिलेले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने देखील बोगस आदिवासींचा दावा अवैध ठरवून. त्यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्याकडून घेतलेल्या लाभाची वसुली करावी असा निर्णय दिला असतानाही. महाराष्ट्र शासन, सर्वोच्च न्यायालय तसेच संपूर्ण आदिवासी समाजाच्या विरोधात निर्णय घेऊन बोगस आदिवासींना संरक्षण देत आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे आदिवासी समाजावर मोठा अन्याय होत आहे. शासनाने बोगस आदिवासी विरोधात घेतलेला निर्णय मागे घ्यावा. यासाठी आज १० फेब्रुवारी रोजी नंदुरबार जिल्ह्यातून समस्त आदिवासी बांधवांच्या विविध संघटनांद्वारे शहरातील महाराणा प्रताप चौक येथून भव्य जनाआक्रोश महामोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

या महामोर्चात हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.यावेळी शासनाला जाब विचारत शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला बोगस आदिवासी विरोधात निर्णय अत्यंत चुकीचा असून सदर निर्णय मागे घ्यावा. मागे न घेतल्यास राज्यभर तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संबंधित आदिवासी संघटनांनी दिला आहे.

सदर जन आक्रोश महामोर्चात आ.आमश्या पाडवी, आ.श्री निकोसे आ.जे.पी.गावीत, मा.मंत्री पद्माकर वळवी, ॲड.सीमा वळवी, निवृत्त अधिकारी समाज कल्याण उपायुक्त अरविंद वळवी, मंत्रालय निवृत्त अधिकारी सदानंद गावित, आदिवासी महासंघाचे डॉ. भरत वळवी, बटेसिंग वसावे, मालती वळवी, जयसिंग माळी, किसन तडवी,नामदेव पटले, रजनीताई शिरीषकुमार नाईक,वाहरू सोनवणे,जयसिंग माळी,अनेश वळवी, कृष्णा गावित, मोहन वसावे यांच्यासह विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

बसची ट्रॅक्टरला धडक, भीषण अपघातात २१ जण जखमी

Next Post

आदिवासी खेळाडुंना क्रीडा क्षेत्रात विविध संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add