तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथे श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन संत सावता माळी भवन येथे करण्यात आले होते. यात 137 पुरुष व 8 महिलांनी असे एकूण 145 रक्तदातांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष श्रीराम मगरे होते. रक्तदान शिबिरांचे उदघाटन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक जितेंद्र माळी, नगरसेवक हेमलाल मगरे, काका गणेश मंडळाचे अध्यक्ष किरण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.मंडळामार्फत सामाजिक व आरोग्यविषयक जनजागृती पर शिबिरे व उपक्रम घेण्यात येत आहेत दि. ११ रोजी नैवैद्य फौंडेशनच्या माध्यमातून गरजूंना अन्नदान करण्यात आले, दि. १३ रोजी मास्क व सॅनिटाईझर चे वाटप करण्यात येणार आहे. तसेच दि. १४ रोजी कुटुंबातील एका व्यक्तीच्या मोफत विमा काढण्यात येणार आहे.
रक्त संकलन श्री नवजीवन ब्लड बँक धुळे यांचे डॉ सुनील चौधरी व त्यांच्या टीम ने केले. प्रत्येक रक्तदात्यांस 16 जीबी पेन ड्राईव्ह भेट स्वरूपात देण्यात आला. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अनिल सूर्यवंशी, कोषाध्यक्ष हेमचंद्र टवाळे, सचिव रत्नाकर शेंडे, माळी समाज पंच सदस्य, मंडळाचे संचालक, सदस्य, महिला व युवक मित्र उपस्थित होते.