Public
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public
No Result
View All Result

लम्पी स्कीन आजारापासून पशूंना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन

Mahesh Patil by Mahesh Patil
September 13, 2021
in कृषी
0

नंदुरबार l प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील घोडजामणे येथील जनावरांमध्ये ‘लम्पी स्किन डिसीज’ या साथरोगाचा निष्कर्ष होकारार्थी आल्याने सदर रोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होऊ नये यासाठी पशुपालकांनी त्यांच्याकडे असलेल्या पशुंना साथीच्या रोगापासून सुरक्षित ठेवण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नंदुरबार यांनी केले आहे.

‘लम्पी स्कीन डिसीज’ हा प्रामुख्याने गाई व म्हशींना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार असून देवी विषाणू गटातील कॅप्रिपॉक्स विषाणूमुळे हा आजार होतो. शेळ्या व मेढ्यांना हा आजार होत नाही. विदेशी वंशाच्या (पाठीवर वशिंड नसलेल्या जसे जर्सी होल्स्टेन इत्यादी ) आणि संकरीत गायींमध्ये देशी वंशांच्या गायीपेक्षा पाठीवर वशिंड असलेल्या भारतीय जातीत रोगबाधेचे प्रमाण अधिक असते. हा रोग सर्व वयोगटातील नर व मादी जनावरात आढळतो. मात्र लहान वासरात प्रौढ जनावरांच्या तुलनेत रोगबाधेचे प्रमाण अधिक असते.

उष्ण व दमट हवामानात कीटकांची वाढ अधिक प्रमाणात होते. उन्हाळ्यात अधिक प्रमाणात आढळतो, मात्र हिवाळयात थंड वातावरणामध्ये या रोगाचा प्रसार कमी प्रमाणात होतो. लम्पी स्कीन डिसिज या आजाराचा रोग दर 2-45 टक्के (सर्वसामान्यपणे 10-20 टक्के) तर मृत्यदर 1-5 टक्के पर्यंत आढळून येतो.

या रोगामुळे जनावरांच्या मरतुकीचे प्रमाण नगण्य असले तरी, बाधित जनावरे अशक्त होत जातात. दूध उत्पादनात मोठी घट होऊन त्यांची कार्यक्षमता खालावते. काही वेळा बाधित जनावरांचा गर्भपात होत असून प्रजननक्षमतासुध्दा घटते. या रोगामुळे त्वचा खराब होत असल्याने जनावरे विकृत दिसतात. हा रोगाचा प्रसार विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने तसेच चावणाऱ्या माश्या (स्टोमोक्सीस), डास, गोचीड, चिलटे यांच्यामुळे होतो.

या विषाणूंचे संक्रमण झाल्यानंतर 1 ते 2 आठवड्यांपर्यंत रक्तामध्ये रहात असून त्यानंतर शरीराच्या इतर भागामध्ये संक्रमण होते. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळ्यातील पाणी व तोंडातील लाळेतुन विषाणू बाहेर पडुन चारा व पाणी दूषित होते व त्यातून इतर जनावरांमध्ये या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ जिवंत राहू शकतात. विर्यात विषाणू येत असल्याने रोगाचा फैलाव कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतनातून होऊ शकतो. गाभण जनावरात प्रादुर्भाव झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो. दुध पिणाऱ्या वासरांना आजारी गायीच्या दुधातुन व कासेवरील व्रणातुन रोगप्रसार होतो.

आजाराची लक्षणे: बाधित जनावरांमध्ये या आजाराचा सुप्तकाळ साधारणपणे 2 ते 5 आठवडे एवढा असुन या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातुन पाणी येते. लसिकाग्रंथीना सुज येणे, भरपूर ताप, दुग्ध उत्पादन कमी होते, चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. त्वचेवर हळूहळू 10-50 मिमी व्यासाच्या गाठी प्रामुख्याने डोके, मान, पाय, मायांग, कास, इत्यादी भागात येतात. काही वेळा तोंड, नाक व डोळ्यात व्रण निर्माण होतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा चघळण्यास त्रास होतो. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, दृष्टी बाधित होते.या आजाराच्या प्रादुर्भावामुळे फुफ्फुसदाह किंवा कासदाह आजाराची बाधा पशूंमध्ये होऊ शकते. रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते. पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

लम्पी स्कीन डिसीजच्या रोगनियंत्रणासाठी गोठा व परिसर नियमित स्वच्छ ठेवावा. परिसरात पाणी साठणार नाही यांची दक्षता घ्यावी. किटकनाशक औषधांची जनावराच्या अंगावर व गोठ्यात फवारणी करावी. बाधित जनावरांची तपासणी करणाऱ्या पशुवैद्यकानी योग्य पोशाख परिधान करावा. तपासणी झाल्यानंतर हात डेटॉल किंवा अल्कोहोल मिश्रित सॅनीटायझरने धुवून घ्यावेत. कपडे व फूटवेयर गरम पाण्यात धुवून निर्जतुक करावेत. जनावरांच्या संपर्कात आलेले साहित्य, वाहन, परिसर इत्यादी निर्जंतुक करावा. सद्यस्थितीत यावर लस उपलब्ध नाही, मात्र शेळ्यात देवीवर वापरण्यात येणारी लस वापरुन हा रोग नियंत्रणात आणता येवू शकतो. तसेच आजारी जनावरांच्या संपर्कातील जनावराना आयव्हरमेक्टीनचे इंजेक्शन दिल्यास किटकनियंत्रण होवून रोगप्रसारात आळा बसु शकतो.

मानवास जनावरापासून हा आजार होत नाही, परंतू शेतकऱ्यांनी जनावरे हाताळल्यानंतर हात साबणाने धुवून घ्यावेत.साथीच्या काळात किंवा नेहमीच सर्वांनी दुध उकळून प्यावेत, मांस शिजवून खावे. प्रादुर्भावग्रस्त भागातुन जनावरांची वाहतूक व विक्री करु नये. रोगग्रस्त जनावराचा मृत्यू झाल्यास मृतदेह 8 फुट खोल खड्डयात पुरावा. पशुपालकांनी लम्पी स्कीन डिसीज लक्षणे आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधून आजारी जनावरांवर औषधोपचार करुन घ्यावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथील क्षत्रिय माळी समाज नवं युवक गणेश मंडळातर्फे आयोजित शिबिरात १४५ दात्यानी केले रक्तदान

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

Next Post
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

असा असेल तुमचा आजचा दिवस : १२ जून राशिभविष्य

असा असेल तुमचा आजचा दिवस : 3 जुलै राशिभविष्य

July 3, 2022
सातपुड्यातील मशरूम व रसायनमुक्त काळ्या तांदळाला अमेरिकेत मागणी

सातपुड्यातील मशरूम व रसायनमुक्त काळ्या तांदळाला अमेरिकेत मागणी

July 3, 2022
शहादा येथील डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय वार्षिक स्नेह संमेलन पर्व 2022 उत्साहात

शहादा येथील डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय वार्षिक स्नेह संमेलन पर्व 2022 उत्साहात

July 3, 2022
राज्यस्तरीय एम.टी.एस. परीक्षेत चोखावाला शाळेतील विद्यार्थीनी एलिना शेख नवापूर केंद्रात प्रथम

राज्यस्तरीय एम.टी.एस. परीक्षेत चोखावाला शाळेतील विद्यार्थीनी एलिना शेख नवापूर केंद्रात प्रथम

July 3, 2022
सार्वजनिक जागी वाढदिवस साजरा करणे पडले महागात, ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सार्वजनिक जागी वाढदिवस साजरा करणे पडले महागात, ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 3, 2022
पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 3, 2022

एकूण वाचक

  • 1,692,461 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group