नंदुरबार l
नुकतीच नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची आढावा बैठक मुंबई येथे पार पडली. आगामी होवू घातलेल्या निवडणूकांमध्ये युवकांचे संघटन मजबूत करणे, प्रभागनिहाय बुथ कमिटी, शाखा स्थापन करणे यासारखे अनेक मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख हे होते. तर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव राऊ दिलीपराव मोरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी आगामी निवडणूकांसाठी युवकांचे संघटन तयार करुन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आघाडीवर कशी राहील, यावर मार्गदर्शन केले. पक्ष संघटना मजबूत करणे, प्रभागनिहाय बुथ कमिटी, जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर शाखा स्थापन करुन प्रत्येक युवकांपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची विचारधारा पोहोचविण्यावर बैठकीत जोर देण्यात आला.
बैठकीस नंदुरबार येथून विद्यार्थी जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे, शहादा येथील नगरसेवक इकबाल शेख, नवापूर तालुकाध्यक्ष आकाश गावीत, नंदुरबार शहराध्यक्ष लल्ला मराठे, महेंद्र कुवर, देवेंद्र राजपूत, दिनेश माळी, राजा ठाकरे, कालू पहेलवान, जितु ठाकरे, जयंत मोरे, लाला बागवान, कान्हा आतारक, शुभम कुंवर, पप्पू कुवर, जगदिश माळी, तुषार सामुद्रे, राजु शिंदे, रवी चव्हाण, लखन गोंधळी, पवन चव्हाण आदी उपस्थित होते.