तळोदा l
तालुक्यातील तुळाजा या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व श्री संकष्टा देवी ट्रस्ट नंदुरबारतर्फे गरजूंना विद्यार्थ्यांना ब्लँकेट, धान्य व आंबा रोपांचे वाटप करण्यात आले.
तुळाजा येथे माधव पावरा यांच्याकडून सरस्वती शिशु विद्या मंदिर सुरू करण्यात आले आहे. या विद्या मंदिरात विद्यार्थ्यांना एकवेळ जेवण देखील देण्यात येते. यात विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच आरोग्य विषय देखील शिकवले जाते. येथील गरजू विद्यार्थ्यांना ब्लँकेट, धान्य व आंबा रोपांचे वाटप करण्यात आले. रोटरी नंदनगरीचे अध्यक्ष अनिल शर्मा यांनी या वेळेस शिशू मंदिरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमास सरपंच श्रीमती मीनाताई राहसे प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तसेच शिशु मंदिराचे पालक माधव पावरा, संकष्टा देवी मंदिर ट्रस्टी राजेश बर्हाणपूरकर, सौ.वर्षा बर्हाणपूरकर, सौ.प्रभा शर्मा, शिशू मंदिराच्या शिक्षीका नीता खराडे आदी उपस्थित होते.