Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिभाऊ करंडक नंदुरबारकरांसाठी पर्वणीच ; वंदना पंडीत

team by team
January 24, 2023
in राज्य
0
जिभाऊ करंडक नंदुरबारकरांसाठी पर्वणीच  ;  वंदना पंडीत

नंदुरबार |  प्रतिनिधी

 

जिभाऊ करंडकच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील नाट्य कलावंत घडत आहेत. राज्यभरातून स्पर्धक या स्पर्धेला येतात व आपला नाट्याविष्कार सादर करतात. नंदुरबारकरांसाठी ही पर्वणीच आहे, असे मत सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री वंदना पंडीत यांनी व्यक्त केले. ते हस्ती-जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेच्या पारितोषीक वितरण प्रसंगी बोलत होते.

 

 

गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदे, ता.जि.नंदुरबार आयोजित राज्य पुरस्कार शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर तथा जिभाऊ  यांच्या स्मरणार्थ दि हस्ती को-ऑप.बँक लि. प्रायोजित व रोटरी क्लब ऑफ नंदनगरी सहप्रायोजित हस्ती-जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा दि.२२ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज्य नाट्य मंदिरात जल्लोषात समारोप झाला. या पारितोषीक वितरण प्रसंगी मंंचावर आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, दि हस्ती को-ऑप बँक लि. दोंडाईचाचे व्यवस्थापकीय संचालक सतिष जैन, रोटरी क्लब नंदनगरीचे डॉ.विशाल चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.सचिन गोसावी, ज्येष्ठ पत्रकार तथा नाट्यलेखक रमाकांत पाटील, डॉ.चेतन चौधरी, डॉ.निखिल चौधरी, फखरुद्दीन जलगुनवाला, दिलीप खैरनार, अभिनेता अनिल मोरे, दिपस्तंभ पुरस्काराचे मानकरी सौ.सुनिता चव्हाण, शाम रंजनकर, दिनानाथ मनोहर आदी उपस्थित होते.

 

 

 

 

या हस्ती-जिभाऊ करंडक दरम्यान दोन दिवसात एकूण १५ एकांकीकाच्या माध्यमातून १८२ नाट्यकलावंतांनी सहभाग नोंदविला. यात नंदुरबार येथील आकार नाट्यसंस्थेच्या द रिंग अगेन ही एकांकीा सादर केली. पारितोषीक वितरण कार्यक्रमप्रसंगी जिभाऊ करंडक आयोजन समितीतर्फे दिला जाणारा मानाचा दिपस्तंभ हा पुरस्कार छाया संगित साधना विद्यालयाच्या संचालिका सौ.सुनिता चव्हाण यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 

एकांकीका स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी एकूण ७ एकांकीका सादर करण्यात आल्या. यावेळी प्रेक्षकांची भरभरुन दाद मिळाली. रविवार असल्यामुळे नाट्यरसिकांनी नाट्यगृहात गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक नागसेन पेंढारकर व तुषार ठाकरे यांनी केले. यावेळी जिभाऊ करंडकच्या १२ वर्षात ज्या सदस्यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी काम केले अशा सर्व सदस्यांचा गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदे तर्फे सन्मान करण्यात आला. स्पर्धेचे परिक्षण डॉ.प्रदीप सरवदे, वंदना पंडीत, विश्‍वनाथ निळे यांनी केले.

 

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयोजक मनोज सोनार, राजेश जाधव, आशिष खैरनार यांच्यासह विनोद ब्राम्हणे, तुषार सांगोरे, कुणाल वसईकर, सागर कदम, चिदानंद तांबोळी, जितेंद्र खवळे, नरेंद्र पाटील, तुषार सांगोरे, जितेंद्र पेंढारकर, एस.एन.पाटील, दर्शन सोनार, पार्थ जाधव, प्रफुल्ल महिरे, सुनिल चौधरी, रवींद्र कुलकर्णी, गौरव पाटील, तनिष्का पेंढारकर आदींनी परिश्रम घेतले.

 

 

स्पर्धेचा अंतिम निकाल
सांघिक प्रथम-ओल्या भिंती, कलासक्त अंधारे, मुंबई, द्वितीय-पडदा, म.गांधी महाविद्यालय, चोपडा, तृतीय-हायब्रीड, प्रताप महाविद्यालय, अमळनेर, उत्तेजनाथ-कंदील, मुळजी जेठा महाविद्यालय, जळगांव, प्रायोगिक-भारतीय, मॅड स्टुडीओ, धुळे, लक्षवेधी-ओसामा, एस.ए.मिशन इंग्लिश स्कुल, नंदुरबार.
वैयक्तीक-उत्कृष्ठ अभिनय पुरुष-प्रथम-अक्षर ठाकरे (पंढरी) हायब्रीड, द्वितीय-लोकेश मोरे (दास्या) कंदील, तृतीय-अभिराज भोसले (म्हातारा), झाड, कावळा आणि प्रेयसी, अत्कृष्ठ अभिनय स्त्री-प्रथम-राजश्री जगदाडे (शालिनी), ओल्या भिंती, द्वितीय-मयुरी धनगर (उमा), हायब्रीड, तृतीय-डॉ.जुईली टेमकर (वैदेही) झुला, उत्कृष्ठ दिग्दर्शन-प्रथम-कंदील, सिद्धार्थ सोनवणे, द्वितीय-योगेश कदम, ओल्या भिंती, तृतीय-अक्षत बैसाणे, हायब्रीड, सर्वोत्कृष्ठ लेखन-अजय पाटील व अदिती जमदरे, पडदा, सर्वोत्कृष्ठ संगीत-वैभव काळे, मधुरा तरटे, अवघडीचे पाच दिवस, सर्वोत्कृष्ठ प्रकाशयोजना-राजन पांचाळे, झुला, सर्वोत्कृष्ठ नैपथ्य-विलास पवार, हायब्रीड.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे माळी समाज वधू-वर परिचय मेळाव्यात पाचशे उमेदवारांचा समावेश

Next Post

नवापूर येथे चार ठिकाणी घरफोडी, नायब तहसीलदार, माजी आमदाराची मुलगी, कृषी अधिकाऱ्याची घरे चोरट्यांनी फोडली

Next Post
नवापूर येथे चार ठिकाणी घरफोडी, नायब तहसीलदार, माजी आमदाराची मुलगी, कृषी अधिकाऱ्याची घरे चोरट्यांनी फोडली

नवापूर येथे चार ठिकाणी घरफोडी, नायब तहसीलदार, माजी आमदाराची मुलगी, कृषी अधिकाऱ्याची घरे चोरट्यांनी फोडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add