नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील श्रीमती डी. आर.हायस्कूल येथे 14 जानेवारी हा भूगोल दिन म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे तर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. नंदा वसावे हे होत्या. तसेच व्यासपीठावर शाळेचे उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी, पर्यवेक्षक पंकज पाठक व विपुल दिवाण,भूगोल विभाग प्रमुख शशिकांत हजारी उपस्थित होते.सर्वप्रथम शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे आंतरवासिता विद्यार्थी शिक्षक ऋषिकेश अहिरे यांनी प्रास्ताविकातून 14 जानेवारीलाच भूगोल दिन का साजरा केला जातो हे आपल्या वक्तव्यातून मांडले. कार्यक्रमाच्या पाहुण्यांचा स्वागत व सत्कार सरस्वती वसावे यांनी घडवून आणला. या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी मयूर रावडे व गोरख गोयकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत 14 जानेवारी चे महत्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या प्रमुखअतिथी नंदा वसावे यांनी भूगोल दिन हा भूगोलतज्ञ सी.डी.देशपांडे यांचा जन्मदिवस म्हणून का साजरा करण्यात येतो.आणि या विषयाचा आपल्या जीवनातील सहसंबंध व महत्त्व सांगत आपला परिसर प्रदूषणमुक्त कसा करता येईल या संदर्भात अभ्यासपूर्ण माहिती स्पष्ट केली. तर अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक नारायण भदाणे यांनी मकर संक्रांति 14 जानेवारी ऐवजी 15 जानेवारीला येण्यामागचे भौगोलिक कारण आपल्या विचारातून स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता चौधरी तर आभार भाग्यश्री वरसाळे यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.








