Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे बापरे : तोरणमाळ, दाब, वालंबा परिसरात दवबिंदू गोठले

team by team
January 15, 2023
in राज्य
0
अरे बापरे : तोरणमाळ, दाब, वालंबा परिसरात दवबिंदू गोठले
नंदूरबार l प्रतिनिधी
थंडीच्या लाटेचा प्रलय नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये अधिक तीव्र असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ तसेच अक्कलकुवा तालुक्यातील दाब, वालंबा या परिसरात दवबिंदू गोठून बर्फाची चादर पसरल्याचे चित्र आहे.
हवामान तज्ञ सचिन फड यांच्या मते सातपुड्यातील  तापमान ६ ते ७ अंश सेल्सिअस सतत असेल तर  दवबिंदू गोठणे असे प्रकार घडतात, सातपुड्यातील पर्वतरांगांमध्ये सध्या थंडीमुळे दवबिंदू गोठले असले तरी प्रत्यक्ष तापमान किती अंशावर आहे हे सांगणे कठीण आहे. कारण या भागात हवामान विभागाच्या वतीने तापमान मापक यंत्रच बसवले नसल्याने नेमकं तापमान किती याचा अंदाज येत नाही. दवबिंदू गोठेपर्यंत थंडीची लाट आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
याचा परिणाम शेती पिकांवरही होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. थंडीपासून बचावासाठी नागरिक गरम कपडे तसेच शेकोटीचा आधार घेताना दिसून येत आहे. सातपुडा पर्वत रांगेतील या भागामध्ये हवामान मापक यंत्र बसवावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे, परंतु अद्यापही या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना केल्या गेलेल्या नाही.
बातमी शेअर करा
Previous Post

डी.आर. हायस्कूलमध्ये भूगोल दिन साजरा

Next Post

आमलाड येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात 

Next Post
आमलाड येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात 

आमलाड येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add