नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथे दि.४ जानेवारी रोजी प्रभा आयुर्वेद रथयात्रा व मोफत चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचा नागरीकांनी मोठया संख्येने लाभ घ्यावा. यावेळी रूग्णांची मोफत तपासणी व सात दिवसांचे औषध मोफत देण्यात येणार आहे. अशी माहिती आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे सचिव राजेंद्रकुमार गावीत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, प्रभा आयुर्वेद फाऊंडेशन आयुर्वेद प्रक्टीशनर्स असोसिएशन नंदुरबार दामजी पोसला गावीत आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल पथराई (ता.नंदुरबार), आदिवासी देवमोगरा एज्युकेशन संस्था नटावद यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदाचा प्रचार व प्रसारासाठी प्रभा आयुर्वेद रथयात्रेचे नंदुरबार येथे दि.४ जानेवारी रोजी येणार आहे.
सदर रथयात्रा गुरूवर्य कै.वैद्यशिरोमणी प्र.ता.जोशी यांच्या स्मृतीनिमित्त राज्यभर काढण्यात येत आहे. यानिमित्त नंदुरबार शहरातील अंधारे चौकातून आमदार कार्यालय, नंदुरबार पालिका, नेहरू पुतळा, बसस्थानक या रस्त्याने निघून रघुकूलनगर येथे समारोप होणार आहे. त्याठिकाणी नंदुरबार जिल्ह्यातील उत्कृष्ट आयुर्वेद चिकित्सक रूग्णांची मोफत तपासणी करणार आहे. यावेळी रूग्णांना सात दिवसाचे औषधी देण्यात येणार आहे. या मोफत चिकित्या शिबीराचे आयोजन दि.४ जानेवारी रोजी नंदुरबार येथील रघुकूलनगर सामाजिक सभागृह आधार हॉस्पीटल जवळ, खोडाईमाता रोड या ठिकाणी दुपारी ३.३० ते ५.३० या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात संधीवात, पोटाचे विकार, दमा, त्वचा विकार, स्त्रीयांचे विकार, मनक्यांचे आजार, मुळव्याध, शोषणाचे आजार तसेच सर्व जुनाट आजारांवर शास्त्रांवक्त मार्गदर्शन व चिकित्सा करण्यात येणार आहे.
या शिबीरात नांव नोंदणी मो.९४२०९५५८२५, ९४२२७३८०४०,९८९०३३८९७९,९४२३९८०१३५, ९४०३४६८२१२ या नंबरवर तर शहादा येथील रूग्णांनी मो.८२७५०१४५५३ या नंबरवर संपर्क साधावा. या शिबीरात जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन राजेंद्रकुमार गावीत यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला डॉ.बी.आर.पाटील,डॉ.राहुल रघुवंशी, डॉ.मनिषा वळवी, डॉ.नेहा गुजराती, डॉ.श्रुति देसाई, डॉ.उज्वला वळवी आदी उपस्थित होते.








