Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नायलॉन मांजाची विक्री व वापरास प्रतिबंध : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

team by team
January 2, 2023
in क्राईम
0
नायलॉन मांजाची विक्री व वापरास प्रतिबंध : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

नंदुरबार l प्रतिनिधी

मकर संक्रांती सणाच्या वेळी प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूचा वापर करून बनविण्यात आलेल्या नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व हाताळणी करण्यास पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 अन्वये प्रतिबंध केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

नायलॉन मांजामुळे पक्षी व मानव जिवितांस इजा होते. काही प्रसंगी त्या इजा प्राणघातक ठरतात. मकरसंक्राती सणाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर पतंग उडविण्याचा खेळ खेळला जातो. पतंगासह तुटलेले नायलॉन मांजाच्या धाग्यांचे तुकडे जमिनीवर पडतात नायलॉन मांजाचे तुकडे हे लवकर विघटन होण्याजोगे नसल्याने गटारे व नदी-नाल्यासारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात. तसेच नायलॉन मांजाचे तुकड्यामुळे गाय अथवा तत्सम प्राण्यांनी नायलॉन मांजाचे तुकडे समाविष्ट असलेले खाद्य सेवन केल्यामुळे त्यांना गुदमरण्याचा त्रास होतो. अशा धाग्यांमधील प्लास्टिकच्या वस्तुंमुळे विविध प्रकारचे दुष्परिणाम होतात. माती व पाण्याच्या गुणवत्तेची पातळी घसरते.

प्लॅस्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याचा वापर पतंग उडविण्याचा सणाच्या वेळी करण्यात येतो. त्यामुळे पक्षांना व मानवी जिवितांस तीव्र इजा होण्याचा नायलॉन मांजाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन अशा धाग्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, तसेच साठवणुकदार यांनी तत्परतेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक थांबवावी. वर्षभरात त्यांची साठवणूक, हाताळणी व विक्री होणार नाही.

पतंग उडवितांना केलेल्या माजांच्या वापरामुळे विजेच्या तारांवर घर्षण होऊन आग लागणे, उपकेंद्र बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जीवीत हानी होणे अशा घटना घडण्याची शक्यता असल्याने, याबाबतची आवश्यक ती खबरदारी घ्यावी. नायलॉन मांजाच्या धाग्याच्या दुष्परिणामांबाबत शाळा,महाविद्यालय तसेच लोकांमध्ये जनजागृती करावी. तसेच सर्व नागरिकांनी निर्देशाचे पालन करावे, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

विसरवाडी येथे एकास मारहाण , तिघांविरोधात गुन्हा

Next Post

नंदुरबार येथे ४ जानेवारी रोजी प्रभा आयुर्वेद रथयात्रा व मोफत चिकित्सा शिबीराचे आयोजन

Next Post
नंदुरबार येथे ४ जानेवारी रोजी प्रभा आयुर्वेद रथयात्रा व मोफत चिकित्सा शिबीराचे आयोजन

नंदुरबार येथे ४ जानेवारी रोजी प्रभा आयुर्वेद रथयात्रा व मोफत चिकित्सा शिबीराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026
स्टेट बँकेत सुरक्षारक्षकाकडून चुकून गोळीबार; एक जण जखमी

स्टेट बँकेत सुरक्षारक्षकाकडून चुकून गोळीबार; एक जण जखमी

June 4, 2026
महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

June 3, 2026
गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

June 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add