रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे संस्थाचालक, कर्तव्यदक्ष अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक -शिक्षकेतरांना नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने (मुंबई) यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
नंदुरबार पालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात दिमाखदार सोहळ्यात रोटरी गुणवंत पुरस्कार २०२१ चा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. रोटरी गुणवंत संस्थाचालक गौरव पुरस्कार प्रा.मकरंद नगीन पाटील व पुष्पेंद्र गोवर्धन रघुवंशी यांना तसेच गुणवंत कर्तव्यदक्ष अधिकारी गौरव पुरस्कार शेखर रौंदळ, मच्छिंद्र कदम, डॉ.राहुल चौधरी, भानुदास रोकडे यांना प्रदान करण्यात आला. गुणवंत प्राध्यापक गौरव पुरस्कार प्रा.डॉ.माधव कदम, प्रा.बुलाखी बागुल तसेच गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार अनिल बाबुराव वायकर, कालिदास गोपालकृष्ण पाठक, हेमंत पुरुषोत्तम पाटील, आसिफ इक्बाल आहद, शेख अकिल शेख अहमद, शशिकांत पांडुरंग पाटील, करण उखाजी चव्हाण, श्रीमती सपना सयाजीराव हिरे, पी.जी.पाटील, रोहिदास वाघ यांना प्रदान करण्यात आला. तसेच गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी गौरव पुरस्कार जयेश लक्ष्मणभाई वाणी यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष मनोज गायकवाड, सचिव अनिल भाई शर्मा, रमाकांत पाटील, डॉ.विशाल चौधरी, शितल पटेल, जितेंद्र सोनार, निलेश तवर, शब्बीरभाई मेमन, फकरुद्दीर्न जलगुनवाला, फय्याज खान, राकेश आव्हाड, प्रोजेक्ट चेअरमन डी.डी.साळुंके, लिटरसी चेअरमन इसरार सय्यद, अजय माळी, पुष्कर सूर्यवंशी, अनिकेत अग्रवाल, इकबाल सर, राहुल पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार किरण दाभाडे यांनी केले.