नंदुरबार l प्रतिनिधी
सरूड ता . शाहूवाडी हे गाव पोलिस अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते . नंदुरबार येथे पोलीस अधीक्षक म्हणून नव नियुक्त झालेले पी.आर. पाटील यांच्या स्पर्धा परिक्षेतील यशानंतरच गावात किंबहुना शाहूवाडी तालुक्यात खऱ्या अर्थाने स्पर्धा परिक्षेचे वारे वाहु लागले . पी . आर . पाटील यांचा आदर्श घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तसेच परिसरातील अनेक युवकांनी स्पर्धा परिक्षेत यश संपादन केले आहे .प्रबळ इच्छाशक्ती , जिद्द आणी चिकाटीच्या जोरावर विक्रीकर निरीक्षक , तहसिलदार , पोलिस उपअधिक्षक , पोलिस उपायुक्त ते पोलिस अधिक्षक ( आय.पी.एस ) पदापर्यंतचा त्यांचा २३ वर्षाचा प्रवास हा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे .
सरूड ( ता . शाहूवाडी ) येथील पी . आर . पाटील यांची नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. प्रबळ इच्छाशक्ती , जिद्द आणी चिकाटीच्या जोरावर विक्रीकर निरीक्षक , तहसिलदार , पोलिस उपअधिक्षक , पोलिस उपायुक्त ते पोलिस अधिक्षक ( आय.पी.एस ) पदापर्यंतचा त्यांचा २३ वर्षाचा प्रवास हा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे . पी . आर . पाटील हे कोल्हापूर नागरी हक्क सरंक्षण विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.आता त्यांची नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. सरुड येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या पी . आर . पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सरुड येथे तर महाविधालयीन शिक्षण मलकापूर येथे झाले . विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर १९९५ मध्ये त्यांनी स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाला सुरवात केली . दोनच वर्षामध्येच त्यांनी विक्रीकर निरीक्षक परिक्षेत यश सपांदन केले . त्यांनतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेतुन १९९८ मध्ये त्यांची तहसिलदारपदी निवड झाली . पंरतू एवढयावर समाधान न मानता मुंबई उपायुक्त विश्वास नांगरे – पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन १९९९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतुनच त्यांनी पोलिस उपअधिक्षकपदाला गावसणी घातली
प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधिक्षक म्हणून प्रथम त्यांची जळगाव येथे नेमणूक झाली . प्रशिक्षणाचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर अचलपूर ( जि . अमरावती ) येथे त्यांची नेमणूक करण्यात आली . अचलपूर बरोबरच त्यांनी पंढरपूर , पुणे ग्रामीण ( राजगुरुनगर ) येथेही पोलिस उपअधिक्षक म्हणून उत्तम सेवा बजावली . त्यांनतर पुणे गुन्हे अन्वेषण शाखेत उपायुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणत मोठमोठ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या . पुण्याहुन त्याची नागपूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे पोलिस अधिक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली झाली . त्यांनतर त्यांची कोल्हापूर नागरी संरक्षण हक्क विभागाचे पोलिस अधिक्षक म्हणून बदली झाली . गेल्या अडीच वर्षापासून ते या पदावर कोल्हापूर येथे कार्यरत होते. येथे सेवा बजावत असतानाच पाटील यांची भारतीय पोलिस सेवेमध्ये पोलिस अधिक्षकपदी ( आय.पी.एस ) म्हणून निवड झाली आहे . आजपर्यंतच्या त्यांच्या या वाटचालीमध्ये त्यांना मुंबईचे उपायुक्त विश्वास नांगरे – पाटील , पोलिस अधिक्षक संदिप दिवाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे .जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांची मुंबई येथे बदली झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पी . आर . पाटील यांची नियुक्ती झाली आहे.
महेंद्र पंडित यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती
नंदुरबार: येथील पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्त पदी नियुक्ती झाल्या आहे
पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी नंदुरबार येथे गेल्या दोन वर्षांपूर्वी कार्यभार घेतला होता.त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात यश मिळवले आहे.नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने अनेक आव्हानात्मक गुन्हे उघडकीस आणले आहेत. दरम्यान, कोरोना प्रादुर्भाव झाल्यानंतर खाकी वर्दीत असणाऱ्या दर्दी अधिकाऱ्याचे त्यांनी दर्शन घडवलं होत. रोजगार हिरावला गेलेल्या अनेक कुटुंबियांना त्यांनी जीवनावश्यक किट वाटप केले होते.यातून नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने माणुसकीचे दर्शन घडविले होते.
कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हजारोंवर गुन्हे दाखल होत कोट्यवधींचा दंड वसुल करीत त्यांनी शासनास महसूल मिळवून दिला.नंदुरबार जिल्ह्यातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी देखील तेवढेच प्रयत्न करण्यात आले.अनेक आव्हानात्मक गुन्ह्याची कोणतेही पुरावे नसताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली उकल करण्यात यश मिळवले.गेल्या दोन वर्षात गुन्हेगारांमध्ये खाकीचा दरारा निर्माण करण्यात महेंद्र पंडित यशस्वी झाले आहेत.कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात एक यशस्वी अधिकारी म्हणून त्यांनी आपली छाप जिल्ह्यात निर्माण केली होती.त्यांची मुंबई शहर उपायुक्त पदी नियुक्ती झाली आहे.आता नंदुरबार येथे पोलीस अधिक्षकपदी कोल्हापूर येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.