नंदुरबार l प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सव काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी याकरीता नंदुरबार जिल्ह्यातील ३ गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण १९ इसमांना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५५ च्या अधिकारान्वये नंदुरबार जिल्हा हद्दीतुन हद्दपार करण्याचे आदेश आज दिले आहेत . नंदुरबार जिल्ह्याच्या स्थापनेपासुन एकाच वेळी १ ९ इसमांना हद्दपार करण्याची ही पहिलीच वेळ आहे . हद्दपार करण्यात आलेल्यांपैकी १४ इसम हे नंदुरबार शहरातील असुन त्यांना दोन वर्षांसाठी तर ५ इसम हे शहादा तालुक्यातील असुन त्यांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे .
नंदुरबार शहरात तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणाऱ्या इसमांना यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा आढावा घेवुन त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करावी याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते . त्यावरुन नंदुरबार शहर पोलीस ठाणेकडून २ टोळ्या व शहादा पोलीस ठाण्याकडून १ टोळीस हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाला होता . सदर हद्दपार प्रस्तावांची छाननी करुन योग्य कायदेशीर प्रकिया पार पाडून ३ गुन्हेगारी टोळ्यातील १९ इसमांना हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहेत . नंदुरबार शहर हद्दीत राहणाऱ्या दोन गुन्हेगारी टोळीतील १४ इसमांविरूद्ध शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल असुन शहादा तालुका हद्दीत राहणाऱ्या एका गुन्हेगारी टोळीतील ५ इसमांविरुध्द मालमते विरुध्द गंभीर गुन्हे दाखल आहेत . नंदुरबार शहर हदीत राहणारे पप्पू ऊर्फ फारुख खान जहिर खान कुरेशी, नायाब खान जहिर खान कुरेशी, फिरोज खान जहिर खान कुरशी, सिकंदर खान जहिर खान कुरेशी, राजु ऊर्फ फिरदोस खान जहिर कुरैशी, मुश्तकीन शेख शहाबुद्दीन कुरेशी, शेख इस्तीयाक अहमद हाजी अब्दुल रज्जाक, शेख अब्दुल रशिद शेख अब्दुल रज्जाक कसाई, शेख अल्ताफ शेख जमिल कुरैशी, शेख कलिम शेख जमिल कुरैशी, शेख जुबेर शेख मुश्ताक कुरैशी, रियाज अहमद मुश्ताक अहमद कुरैशी, निहाल अहमद शेख अश्पाक कुरेशी, शेख शकिल शेख इसाक कसाई तर शहादा पोलीस ठाणे हद्दीत राहणारे महेंद्र घरम ठाकरे, आझाद विठ्ठल ठाकरे, मंगल शंकर ठाकरे, गोरख मोहन ठाकरे, शामा सरदार ठाकरे सर्व डामरखेडा ता . शहादा अशी हद्दपार करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत , हद्दपार आदेशाची अमंलबजावणी तातडीने करण्यात येत असुन हद्दपार इसमांनी आदेश प्राप्त झाल्यावर ४८ तासाचे आत तातडीने जिल्हा हद्दीबाहेर निघुन जाण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत . आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांचे विरुध्द प्रचलीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे .