तळोदा l प्रतिनिधी
येथील मूकेश बन्सीलाल पवार(अल्युमिनियम फर्निचर मिस्तरी) याची ई-फसवणूकीने बँक खात्यातून एक लाख सोळा हजार नऊशे पंधरा रुपये फसवणूकीने काढून घेतल्याची घटना घडली असून आँनलाईन सायबर पोलिसात तशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मूकेश बन्सीलाल पवार यांना फोन आला व सांगीतले कि, एस. बी.आय मधून बोलतो.तूमच्या खात्यात बरीच रक्कम
कधीपासून पडून आहे.कूठलेही व्यवहार कधी पासून केलेले नसल्याने तूम्हाला पेनल्टी लागेल.यांत तूमचा पैसा कापला जाईल.पेनल्टी वाचवण्यासाठी रिमोट कंट्रोल ऍप डाऊनलोड करा.आओटीपी येईल तो मला द्या.तर तूमचा सर्व पैसा सूरक्षित राहील.समोरच्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार मूकेश पवार करत गेला आणि एटीएम कार्डचा आठ वेळा उपयोग करत अकाऊंट मधून कमी होत -होत क्षणार्धात अकाऊंट मधून एक लाख सोळा हजार नऊशे पंधरा रुपये कमी झाले.हे समजल्यावर मुकेश पवार यांनी पोलीस स्टेशनमध्ये सायबर सेल कडे तक्रार दाखल केली आहे.याबाबत एसबीआय बँक शाखा तळोदा च्याया शाखा व्यवस्थापकांनि ही अर्ज देऊन खात्यात पैसे परतावा साठी प्रयत्न करण्याचे पत्र दिले आहे. घटनेची सर्वत्र चर्चा असून खातेधारकांध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दररोज बदलते तंत्रज्ञान आवाक्यात आले आहे.त्यामूळे सर्व सामान्यांची अनेक कामे हलकी झालीं आहेत.मात्र या सूविधा मिळत असतानाच तंत्रज्ञानाचे गैरफायदा घेण्याचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत आहेत.ऑनलाईन फसवणूकीचा घटना ही नित्याचीच बाब झाली आहे.अनेकांना मी अमूक बँकेतून बोलतो तूमचे एटिएम कार्ड बंद होईल .रिन्यूल करून देतो.तूमच्या एटीएम कार्डचा मागील बाजूस तीन अंकी नंबर (सीव्हीव्ही)सांगा,अशा पद्धतीने ही अनेकांचे अकाऊंट खाली झाले आहेत.काही प्रकारांमध्ये सोशल मीडियावर तूमचा मोबाईल नंबर आमच्या कंपनीकडून सिलेक्ट झाला आहे.तूम्हाला एक करोड रुपये बक्षीस मिळणार सांगून आपल्या बँक खात्याचा, वैयक्तिक तपशील मागतो किंवा एक लिंक देऊन त्या लिंकवर अपडेट करण्यास सांगतो,अमिष दाखवून प्रोसेसिंग फी च्या नावाखाली थोडे थोडे करून पैसे उकळतात.कोणी हमीबद्ध परतावा देण्याचे सांगत नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळतात.
मेल मेसेज मधील लिंकवर क्लिक करून ऍप डाऊनलोड करणे धोक्याचे आहे.असे ऍप आपल्या मोबाईलचा ताबा त्यांच्या हातात घेऊन,सगळी माहिती मिळवतात आणि आर्थिक नुकसान करतात.तसाच प्रकार तळोदा येथे घडला आहे.असे प्रकार तालुक्यात नियमीत घडतात मात्र रक्कम कमी असली किंवा पोलिसांपासून लांब राहण्याचा वृत्तीमुळे अनेक गून्हे बाहेरच येत नाही.








